Sara Tendulkar : सेलिब्रिटी किड सारा तेंडुलकरकडून काय शिकता येईल?

Sara Tendulkar : शिक्षणाने डॉक्टर असलेली सारा सध्या फॅशन जगतातही आपलं नशीब आजमावत आहे

154
Sara Tendulkar : सेलिब्रिटी किड सारा तेंडुलकरकडून काय शिकता येईल?
Sara Tendulkar : सेलिब्रिटी किड सारा तेंडुलकरकडून काय शिकता येईल?

वडील देशातील त्यांच्या काळातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि आई उद्योजकाची मुलगी आणि स्वत: डॉक्टर. त्यामुळे सारा तेंडुलकरसाठी (Sara Tendulkar) सगळ्या गोष्टी लहानपणी सोप्या असतील असं तुम्हाला वाटेल. पण, गोष्टी सोप्या असताना मुलांसाठी कठीण मार्ग निवडण्यासाठी जागरुक पालक आणि समजूतदार मूल लागतं. (Sara Tendulkar)

सारा शाळेत असतानाचा एक किस्सा सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) एका मुलाखतीत सांगितला होता. तिच्या पाठ्यपुस्तकात सचिन तेंडुलकरवरच एक धडा होता. पण, तो क्रिकेटवर नाही तर त्याचा दानधर्म आणि इतर गोष्टींवर होता. साराने तो धडा शिक्षिकेकडून ऐकला. ती एवढंच म्हणाली, ‘माझ्या पण वडिलांचं नाव सचिन तेंडुलकरच (Sachin Tendulkar) आहे.’ तिला तो धडाच तिच्या वडिलांवर आहे हे माहीत नव्हतं! घरात इतक्या साधेपणाचे संस्कार असल्यामुळेच कदाचित सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) इतर सेलिब्रिटी किड्सपेक्षा वेगळी ठरते. (Sara Tendulkar)

(हेही वाचा- Dombivli MIDC Blast : सोन्याच्या अंगठीमुळे डोंबिवली स्फोटातील मृत महिलेची ओळख पटली )

तिची आई अंजली तेंडुलकर (Anjali Tendulkar) ही मुंबईच्या जे जे रुग्णालयातून मास्टर्स केलेली बालरोगतज्ज आहे. तिच्या पावलावर पाऊल टाकून साराने आपलं मेडिकलचं शिक्षण पूर्ण केलं आहे. धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) इंटरनॅशनल शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यावर तिने लंडनच्या प्रतिष्ठित युसीएल कॉलेजमधून मेडिकलचं शिक्षण पूर्ण केलं आहे. या शिक्षणाबरोबरच फिटनेस आणि फॅशनच्या क्षेत्रातही तिला रस आहे. अलीकडेच तिने के – फॅशन या ब्रँडबरोबर करारही केला आहे. साराला शिक्षण आणि फिटनेस या क्षेत्रात मिळालेल्या यशातून काही प्रेरणादायी गोष्टी आपल्यालाल शिकता येतील. (Sara Tendulkar)

कटीबद्धता 

सारा (Sara Tendulkar) जे करायचं ठरवते त्याला आपला पूर्ण वेळ आणि श्रम देते. तिची तंदुरुस्ती, आहार आणि अभ्यास याचं वेळापत्रक ती कधीही बिघडू देत नाही. जिमच्या तिच्या वेळा किती ठरलेल्या आहेत आणि किती नियमितपणे ती वांद्रे इथं ठरावीक जीमबाहेर दिसते हे मीडियातील लोकांना सांगायला नको.  (Sara Tendulkar)

(हेही वाचा- Maharashtra Weather: राज्यासह देशात ऊन-पावसाचा खेळ सुरूच राहणार? IMD चा अंदाज काय सांगतो?)

विविधता

सारा (Sara Tendulkar) एकाच एक प्रकारचा व्यायाम करत नाही. त्या बाबतीत ती लवचिक आहे. कार्डिओ व्यायाम प्रकारांबरोबरच ती धावणे, चालणे आणि जलतरण यांचाही नियमितपणे सराव करते. अनेकदा ती मुंबईतील विविध मॅराथॉनमध्ये धावताना आपल्याला दिसली आहे. (Sara Tendulkar)

नियमितता

तंदुरुस्ती असो की, अभ्यास सारा (Sara Tendulkar) नियमित आहे. तिची व्यायामाची वेळ ती कधीही चुकवत नाही.  आखलेला व्यायाम तसंच आहार पाळते. तिला योगाचीही आवड आहे. ती घरचं अन्नच खाते. तिला स्वत:ला जेवण बनवायला आवडतं असं तिचे वडील सचिन तेंडुलकर यांनी एकदा सांगितलं होतं.  (Sara Tendulkar)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: राज्यात दुष्काळ, आचारसंहिता शिथिल करा; राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती)

के फॅशन ब्रँड अँबेसिडर 

२०२३ पासूनच साराने (Sara Tendulkar) फॅशन आणि मॉडेलिंगमध्ये पाऊल ठेवलं आहे. एजिओ लक्स ब्रँडच्या जाहिरातीत ती दिसली होती. त्यानंतर आता कोरियन फॅशन ब्रँड लेनिजशी साराने नुकताच करार केला आहे. तिच्या चेहऱ्याचं वर्णन अनेकांनी आरसा किंवा काचे इतकं पारदर्शक आणि गुळगुळीत असं केलं आहे. त्यासाठी ती नेमकं काय करते, याची माहिती ती लोकांना एका मोहिमेतून आता देणार आहे.  (Sara Tendulkar)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.