साता-यात वारक-यांच्या ट्राॅलीला अपघात; 30 वारकरी जखमी तर एका वारक-याचा मृत्यू

साता-यात वारक-यांच्या ट्राॅलीचा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. शिरवळ जवळच्या महामार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघातात 30 वारकरी जखमी झाले आहेत, तर एका वारक-याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे येथील हे वारकरी असल्याची माहिती मिळत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे येथील वारकरी आळंदीला निघाले होते. साता-यात त्यांच्या ट्राॅलीला मागून एका अवजड वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात 30 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत, तर एका  वारक-याचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर तत्काळ या वारक-यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

( हेही वाचा :रेल्वे स्थानकांभोवतीचा फेरीवाल्यांचा विळखा सुटतोय! जे चहल यांना जमले नाही, ते पांडेंनी करून दाखवले )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here