सच्चिदानंद राउतराय हे एक भारतीय कवी, कादंबरीकार आणि लघुकथा लेखक होते. त्यांनी आपलं लिखाण ओडिसी भाषेत लिहिलं होतं. १९८६ साली त्यांना भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. ते क्रांतिकारक कवी होते. साची राउतराय या नावाने ते प्रसिद्ध होते.
सच्चिदानंद राउतराय यांचा जन्म १३ मे १९१६ साली खुर्द जवळच्या गुरुजंग नावाच्या गावात झाला. त्यांचे बालपण बंगालमध्ये झालं. त्यांचं शिक्षणही तिथेच झालं.
(हेही वाचा – CSMT Subway : नूतनीकरणाच्या कामाची ‘स्टेप’ चुकली; नवीन लाद्यांवर आताच पडू लागलेत प्रवासी)
अकराव्या वर्षांपासून कविता लिहायला सुरुवात
सच्चिदानंद राउतराय यांनी वयाच्या अकराव्या वर्षांपासून कविता लिहायला सुरुवात केली होती. ते शाळेत असताना त्यांनी स्वातंत्र्य संग्रामातही आपला सहभाग घेतला होता. त्या काळी क्रांतिकारी साहित्य लिहिण्यावर ब्रिटिशांनी बंदी घातली होती. सच्चिदानंद राउतराय यांनी गोलपल्ली येथील राजघरण्यातल्या एका तेलगू राजकुमारीशी विवाह केला होता.
सच्चिदानंद राउतराय यांनी १९३२ साली आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी पथेय नावाचा आपला पहिला कविता संग्रह लिहिला होता. १९४३ साली एक नाविक मुलगा ब्रिटिशांच्या गोळ्यांना बळी पडला होता. त्या वेळी त्या नाविक मुलाच्या हौतात्म्याचं वर्णन करणारी एक दीर्घ कविता सच्चिदानंद राउतराय यांनी लिहिली होती. ही कविता प्रकाशित झाल्यानंतर सच्चिदानंद राउतराय हे ओडिसी वाचकांमध्ये प्रसिद्ध झाले.
(हेही वाचा – CBSE Result 2024: CBSE दहावी, बारावीचा निकाल लागला ; ८७.९८ टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल)
वीस काव्यसंग्रह प्रकाशित
सच्चिदानंद राउतराय हे एक प्रतिभावंत कवी होते. त्यांचे एकूण वीस काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांची पल्लीश्री ही कविता ओडिसी खेडेगावातल्या जीवनशैलीशी निगडित होती. ही कविता शहरी मुलींची परिस्थिती आणि दुःख कथन करणाऱ्या नायक नावाच्या कवितेसारखीच यशस्वी आहे.
सच्चिदानंद राउतराय यांना साहित्यातल्या योगदानासाठी १९६२ साली पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. १९६३ साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. तसेच १९६५ साली सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार आणि १९८६ साली ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. याव्यतिरिक्त त्यांना केंद्र साहित्य अकॅडमीकडून आजीवन फेलोशिप, महाकवी सन्मान आणि साहित्य भारती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community