#The Kashmir Files: बिट्टा कराटेविरोधात सतीश टिक्कूचे कुटुंबीय न्यायालयात!

139

‘द कश्मीर फाइल्स’च्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचे पलायन आणि हत्याकांड चर्चेत आले आहे. दरम्यान, 31 मार्च रोजी सतीश टिक्कू यांच्या कुटुंबियांकडून न्यायालयामध्ये बिट्टा कराटेविरोधातील प्रकरणाची नव्याने सुनावणीची मागणी करण्यात आली आहे. तब्बल 31 वर्षांनी सतीश टिक्कू यांच्या कुटुंबियांनी फारुख अहमद दार म्हणजेच बिट्टा कराटेविरोधात श्रीनगर न्यायालयात धाव घेतली आहे. सतीश हे काश्मिरी पंडितांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये प्राण गमावलेले पहिले व्यक्ती असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिट्टा कराटाने पहिल्यांदा ज्या व्यक्तीची हत्या केली त्या काश्मिरी पंडिताचं नाव सतीश टीकू होते असे सांगितले. श्रीनगर सत्र न्यायालयाने सतीश यांच्या कुटुंबियांच्या वकिलांना 16 एप्रिलपर्यंत याचिकेसंदर्भातील मागणीचे कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 एप्रिल रोजी होणार आहे.

या कारणाने फेटाळली होती याचिका

काश्मिरी पंडितांसाठी काम करणाऱ्या एनजीओने 24 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात 1989-90 मध्ये दहशतवादाच्या शिखरावर असताना खोऱ्यात झालेल्या हत्यांची चौकशी करण्याची मागणी करणारी क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. रूट्स इन काश्मीर या एनजीओने क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या 2017 च्या आदेशाविरुद्ध दाखल केली होती, ज्याने दीर्घ विलंबाचे कारण देऊन चौकशीसाठी संस्थेची याचिका फेटाळली होती.

फुटीरतावाद्यांची चौकशी करून खटला चालविण्याची मागणी

सर्वोच्च न्यायालयाने एनजीओने दाखल केलेली याचिका 24 जुलै 2017 रोजी फेटाळून लावली होती की काश्मिरी पंडितांच्या पलायनानंतर 27 वर्षांहून अधिक जुन्या घटनांची चौकशी करणे आणि पुरावे गोळा करणे कठीण आहे. क्युरेटिव्ह याचिकेत पक्षकारांना सुनावणीची संधी देऊन गुणवत्तेनुसार या खटल्याचा नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडे मागितले आहेत. राज्यात 1989-98 दरम्यान 700 हून अधिक काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली आणि 200 हून अधिक प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. परंतु एकाही प्रकरणात आरोपपत्र दाखल होऊ शकलेले नाही. याचिकाकर्त्या एनजीओने 2017 मध्ये दाखल केलेल्या याचिकेत एफआयआरमध्ये नाव असलेल्या यासिन मलिक आणि बिट्टा कराटे यांसारख्या फुटीरतावाद्यांची चौकशी करून हत्येचा खटला चालवावा, अशी मागणी करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.