शनिवारी राज्यभरातून एकाच दिवसांत चक्क पन्नास हजार रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. 50 हजार 142 रुग्ण कोरोनातून यशस्वी उपचार घेऊन घरी परतले तर 27 हजार 971 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मात्र कोरोना तपासणीबाबत आताही कित्येकजण सतर्क नसल्याची खंत आरोग्य विभागाने व्यक्त केली.
कोरोना रूग्णांत होते घट
गेल्या आठवड्याच्या मध्यापासून ठाणेपाठोपाठ पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट नोंदवली जात आहे. मात्र पुण्यात तिसरी लाट आटोक्यात आली असे सकारात्मक चित्र सध्यातरी नाही अशी माहिती राज्याचे आरोग्यविभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी दिली. तर नागपूर आणि नाशकात येत्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांत वाढ होण्याची भीती डॉ व्यास यांनी व्यक्त केली.
राज्यात 85 नव्या ओमायक्रोनच्या रुग्णांची नोंद
दरम्यान राज्यात 85 नव्या ओमायक्रोनच्या रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 44 ओमायक्रोनचे रुग्ण पुण्यात, 39 मुंबईत तर पुण्यातील ग्रामीण परिसरात आणि अकोल्यात प्रत्येकी एक रुग्ण सापडला. राज्यात आतापर्यंत 3 हजार 125 ओमायक्रोनच्या रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली.
Join Our WhatsApp Community