कसारा-आसनगाव दरम्यान शनिवार, रविवारी रेल्वे ब्लॉक

मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकावर ६ मीटर पादचारी पुल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले असून तीन टप्प्यात गर्डर लॉंच  करण्यात येणार आहे.  यासाठी शनिवारी ७  व ८ मे रोजी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक केला जाणार आहे. शनिवारी दुपारी व रविवार मध्यरात्रीला दोन ब्लॉक, तर रविवारी दुपारपर्यंत तिसरा ब्लॉक या मार्गावर घेतला जाणार आहे. या कालावधीत काही उपनगरीय लोकल रद्द केल्या जाणार असून काही लोकल शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत.

कोणत्या गाड्या बंद असणार?

शनिवारी दुपारी २.२५ ते ३.३५ पर्यंत आसनगाव ते कसारा दरम्यान अप मार्गावरील उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन तथा गाड्या रद्द केल्या जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.४२ आणि १२.३० वाजता कसार्‍यासाठी सुटणारी लोकल आसनगाव येथे शॉर्ट टर्मिनेट होईल आणि आसनगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस धिमी लोकल आसनगावहून दुपारी १.४८ आणि दुपारी २.५० वाजता निघेल. तर कसारा येथून दुपारी २.४२ आणि दुपारी ३.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरीता सुटणारी लोकल रद्द करण्यात येईल, असे रेल्वेने स्पष्ट केले. आसनगाव ते कसारा दरम्यानची उपनगरीय सेवा डाउन दिशेला सकाळी ११.५५ ते दुपारी ३.१० पर्यंत आणि अप दिशेला दुपारी १.३० ते सायंकाळी ४.१५ पर्यंत बंद राहील. ब्लॉक दरम्यान, कसारा येथून सुटणाऱ्या आणि संपणाऱ्या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून चालवण्यात येतील, अप मेल/एक्स्प्रेस गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून चालवण्यात येतील आणि डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या प्लॅ.टफॉर्म क्रमांक १ वरून चालवण्यात येतील.

(हेही वाचा रेल्वेची आरक्षण प्रणाली पाच तास बंद)

शनिवारी-रविवार मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत घेण्यात येणार ब्लॉक

शनिवारी व रविवार मध्यरात्री ३.३५ ते पहाटे ४.५५ पर्यंत आसनगाव आणि कसारा अप व डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी पहाटे ४.५९ वाजता कसारा येथून सुटणारी अप लोकल पहाटे ५.१५ वाजता सुटेल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

रविवार दुपारपर्यंत असणार या मार्गावर ब्लॉक  

रविवार, ८ मे २०२२ रोजी सकाळी १०.५० ते दुपारी १२.२० पर्यंत डाउन मार्गावर आणि दुपारी २.५० ते दुपारी ३.५० पर्यंत आसनगाव आणि कसारा दरम्यान अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३४ आणि दुपारी १२.३० वाजता कसार्‍यासाठी सुटणारी लोकल रद्द केली जाईल. कसारा येथून दुपारी १२.१९ आणि ३.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणारी लोकल कसारा ते ठाणे दरम्यान रद्द राहिल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here