सावरकर, बोस यांच्यावर अधिक जुलूम ब्रिटिशांपेक्षा स्वातंत्र्यानंतरच्या सरकारांनी केले – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

‘स्वातंत्र्यकवि गोविंद यांची कविता’चे ऑनलाईन प्रकाशन

130

इंग्रजांनी जे जुलुम सावरकर, बोस आदींवर केले त्यापेक्षाही अधिक जुलूम स्वतंत्र भारताच्या सरकारांनी त्यांच्यावर केले आहेत, अशी परखड टीका ज्येष्ठ पत्रकार, सावरकर अभ्यासक आणि राजकीय विश्लेषक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी शनिवारी येथे केली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने ‘स्वातंत्र्यकवि गोविंद यांची कविता’ या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीची निर्मिती केली आहे. त्याचे शनिवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५६ व्या आत्मार्पण दिनी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या ऑनलाईन प्रकाशन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणूून बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सध्याची स्थिती, स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आदींच्या योगदानाची बलिदानाची महती सांगत त्यांच्यावर कसा अन्याय झाला आहे, तसेच स्वातंत्र्यानंतरची आणि विद्यमान राजकीय स्थिती यासंबंधात अतिशय बारकाईने विश्लेषण केले.

(हेही वाचा – मुंबई महापालिकेकडे ९२ हजार ६३६ कोटींची मुदतठेवींची रक्कम!)

ते म्हणाले की, सावरकरांना फसवणारे अनेक हिंदुवादीही नेते त्यावेळी होते, आज भारत २०२२ चा भारत आहे. आज सावरकरांची छायाचित्रे, तसबिरी आपल्या संघटनेच्या कार्यालयात छोटीशी का होईना लावावी म्हणजे त्यांना मानणारे आपल्या बरोबर राहातील, असा हेतू मनात ठेवला जात आहे. मात्र या संघटनांना सावरकर आपल्या संघटनेचे आदर्श बनू नयेत, अशी दक्षताही घेत असल्याची खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली.

बोस-सावरकरांचे व्हिजन शिवाजी महाराजांसारखे

सनातनी हिंदूंना आज समझोतावादी बनवायचे आहे, तशी मानसिकता पक्ष आणि संघटनांमध्येही आहे. १९४० मध्ये बोस-सावरकर भेट झाली. त्यांचे व्हिजन हे शिवाजी महाराज, विवेकानंद यांचे होते. ते भेटले आणि त्याचा संदर्भ वाचनात येतो तेव्हा एक स्पष्ट लक्षात येते की, हिंदूंनी सैन्यात भरती व्हावे, जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा भारताची सेना आपोआप होणार नाही ती यातून तयार झालेली असणार आहे, ही सावरकर यांची कल्पना होती. त्यादृष्टीने भेटीतही त्यांनी ती व्यक्त केली होती. असे सांगून कुलश्रेष्ठ म्हणाले की, सावरकरांनी विविध घटकांसाठी विचार व्यक्त केले. १९२८ मध्ये त्यांनी लेख लिहिला आणि पहिल्या जागतिक युद्धात आपण संधी गमावली ती दुसऱ्या जागतिक युद्धात गमावू नये, असे त्यांनी लिहिले आणि त्यानंतर दुसरे महायुद्ध झाले होते, हे लक्षात घेतले पाहिजे.

आधुनिक प्रसारमाध्यमांमुळे खरे बाहेर येतेय

गुलामीचा इतिहास शिकवणारी राष्ट्रे कमकुवत होतात. येथील सरकारांनी ते नक्की केले आणि खऱ्याला लपवले आता आधुनिक प्रसारमाध्यमांमुळे खरे बाहेर येऊ लागले आहे. सुभाषचंद्र बोस यांना स्वतंत्र भारतात वॉर क्रिमिनल म्हणून घोषित केले होते. ट्रान्स्फर ऑफ पॉवर करताना अलिखित समझोता केला गेला. त्यात सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यानंतरही जिवंत वा मृत मिळाले तरी ब्रिटिशांच्या हवाली करू असेच सांगितले गेले. ही त्यांची सारी कथाच लोकांपुढे लपवली. त्यामुळे भारताची फाळणी, ब्रिटिशांनी फूट पाडल्याने झाली असे जे सांगितले जाते; पण तसे नाही ज्यांनी घोषणा दिल्या तेच इंग्रजांपेक्षा अधिक धोकादायक होते आणि ठरले, असेही कुलश्रेष्ठ म्हणाले.

सावरकर भक्तांची नव्हे, अनुयायांची गरज – रणजित सावरकर

सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर म्हणाले की, सावरकर यांचे देशभरात विविध ठिकाणी आज पुतळे उभारले गेले आहेत. आज त्यांना हारही घातले जात आहेत. सावरकर भक्तांची संख्या वाढत आहेच पण आम्हाला भक्त नव्हे तर अनुयायांची गरज आहे. सावरकर यांच्या विचारांचे पुनरुज्जीवन त्यामुळे होऊ शकेल. त्याची आवश्यकता अधिक आहे.

हलाल प्रमाणपत्रामुळे पैसा दहशतवाद्यांपर्यंत जातोय!

हलाल प्रमाणपत्राबद्दलही त्यांनी यावेळी जोरदार टीका करून हलाल प्रमाणपत्रामुळे जाणारा पैसा दहशतवाद्यांपर्यंत जात आहे, असे सांगत हलाल बोर्ड व प्रमाणपत्रांची दुकानांमधून खरेदी करणार नाही, इतके लोकांनी हिंदूंनी करावे.

अद्ययावत राहण्याची गरज – प्रवीण दीक्षित

स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित म्हणाले की, सावरकरांनी अद्ययावत राहावे असे लोकांना सांगितले होते. त्याची गरज आहे. समाजाने त्यासाठी काय करावे त्याचे मार्गदर्शन सावरकरांनी केले होते. या विविध घटकांबाबत त्यांनी विचार मांडले ते विचार आज आचरणात आणले पाहिजेत, स्वीकारायला हवेत. यावेळी स्वातंत्र्यकवि गोविंद यांच्या या पुस्तक निर्मितीसाठी मोलाचे आर्थिक सहाय्य सावरकर स्मारकाला देणाऱ्या ९५ वर्षांच्या भानुमती प्रभाकर घाटपांडे यांनी आपल्या भाषणात या पुस्तकाच्या कामासाठी आपल्याला योगदान करता आले त्याबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, आपली मानसकन्या सुवर्णा महाबळ यांनी संवाद साधून या अर्थसहाय्यासाठी विनंती केली. मलाही त्यामुळे आनंद झाला. पती प्रभाकर घाटपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने हे पवित्र राष्ट्रकार्य घडले. यावेळी त्यांच्या स्नुषा सुखदा घाटपांडे यांनीही यावेळी समयोचित भाषण केले. त्यांनी प्रभाकर घाटपांडे यांच्या माणुसकीची, निरिच्छ कामाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शार्दुल आपटे यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.