स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांना अभिप्रेत असलेले काम करणाऱ्या त्यांच्या मित्राचा म्हणजेच भागोजीशेठ कीर (Bhagoji Keer) यांच्या पुतळ्याला स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) राष्ट्रीय स्मारकाच्या वास्तूमध्ये, त्यांच्याच शेजारी स्थान देऊन ‘मैत्र जीवांचे’ हे या कार्यक्रमाचे नाव सार्थ ठरवले, असे गौरवोद्गार मुंबई शहराचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काढले.
स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) राष्ट्रीय स्मारक आणि अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) आणि भागोजी कीर यांच्या अर्ध-पुतळ्याचे अनावरण दीपक केसरकर यांच्या हस्ते आज ८ मार्च रोजी करण्यात आले. यावेळी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे, स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Veer Savarkar), भागोजी कीर यांचे नातू अंकुर कीर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, अविनाश महाराज, प्रा. प्रदीप ढवळ उपस्थित होते.
जन्म आणि मृत्यू याच दिवशी
“आज महाशिवरात्र आहे आणि योगायोग आहे की, या दिवशीच भागोजीशेठ (Bhagoji Keer) यांचा जन्म झाला होता आणि शेवटचा श्वाससुद्धा त्यांनी याच दिवशी घेतला. एखादा मनुष्य किती भाग्यवान असू शकतो, याचे हे उदाहरण आहे. रणजित सावरकर यांचे आभार मानतो की जिथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिप्रेत असलेले काम चालते, तिथे त्यांच्या मित्राचा, कीर (Bhagoji Keer) यांचा पुतळा बसवला,” असे केसरकर म्हणाले.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : ‘२६ जुलै’च्या पुराची आठवण काढत मुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका)
कुडाळला मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह
भंडारी समाजाचे कौतुक करताना केसरकर पुढे म्हणाले की या समाजाने आपल्याला निवडून आणण्यात मोठा वाटा उचलला. “एकदा जीव ओवाळून टाकला की हा समाज तुमच्यासाठी काहीही करेल. कोंकणी भाषा ज्यांनी सातासमुद्रपार पोहोचवली अशा मच्छिंद्र कांबळी यांच्या नावाने कुडाळला नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. तसेच मुलांसाठी हॉस्टेल आणि समाजाचे कार्यालयही बांधण्यात येणार आहे,” असे केसरकर यांनी जाहीर केले.
दोन्ही स्मारकांना सोमवारी मान्यता
“मुंबईच्या जडणघडणीत ज्या दोन महान व्यक्तींचा मोलाचा वाटा आहे त्यापैकी एक नाना शंकर शेठ आणि दुसरे भागोजीशेठ कीर (Bhagoji Keer). यांच्या स्मारकचा विषय सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला येणार असून आचारसंहिता लागू नाही झाली तर दोन्ही स्मारकांना सोमवारीच मान्यता देण्यात येईल,” अशी घोषणा मुंबईच्या पालकमंत्र्यांनी केली. अधिक माहिती देताना ते म्हणाले, “कीर (Bhagoji Keer) यांच्या स्मारकासाठी मुंबई महापालिकेने जागा निश्चित केली असून त्या जागेवरील अतिक्रमण हटवून स्मारक बांधण्यात येईल. तसेच हे डबल इंजिन सरकार आहे आणि बोलते तसे स्पीडने काम करते,” असे केसरकर यांनी स्पष्ट केले. केसरकर यांनी समाजासाठी एक लाख रुपये देणगी यावेळी जाहीर केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community