Savitri Jindal Net Worth : भारतातील सगळ्यात श्रीमंत महिला आहे राजकारणातही सक्रिय 

Savitri Jindal Net Worth : ७४ व्या वर्षी त्यांनी हरयाणा राज्यात मंत्रीपदही भूषवलं आहे 

194
Savitri Jindal Net Worth : भारतातील सगळ्यात श्रीमंत महिला आहे राजकारणातही सक्रिय 
Savitri Jindal Net Worth : भारतातील सगळ्यात श्रीमंत महिला आहे राजकारणातही सक्रिय 
  • ऋजुता लुकतुके

समाजामध्ये वावरताना त्यांचा साधा पेहराव, पांढऱ्या रंगाची साडी आणि कायम पदर अंगावरून घेतलेला यामुळे त्यांच्या खानदानाची कल्पना पटकन कुणाला येत नाही. पण, ७४ वर्षीय सावित्री जिंदाल जिंदाल उद्योगसमुहाच्या अध्यक्ष आहेत. आणि ४,००० कोटी अमेरिकन डॉलरच्या मालमत्तेसह त्या देशातील सगळ्यात श्रीमंत महिला आहेत. फोर्ब्सने अलीकडेच सलग चार वर्षं त्यांचं हे स्थान अबाधित असल्याचं नवीन अहवालात जाहीर केलं आहे. ३३.५ अब्ज अमेरिकन डॉलरच्या मालमत्तेसह त्या भारतातील चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीही आहेत. (Savitri Jindal Net Worth)

(हेही वाचा- Star – Reliance Merger : व्हायकॉम १८ आणि डिस्नी स्टार विलिनीकरणाच्या अटी काय? नवीन कंपनी कशी काम करणार?)

जिंदाल समुह हा पोलाद, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि सिमेंट क्षेत्रात कार्यरत आहे. सावित्री यांचे पती ओ पी जिंदाल यांनी नवी दिल्लीत १९७९ साली या समुहाची स्थापना केली होती. आणि ओमप्रकाश यांच्या पश्चात सावित्री या समुहाच्या प्रमुख बनल्या. तेव्हापासून त्या देशातील श्रीमंत महिला म्हणून कायम आहेत. पण, त्यांचा पहिला ओढा हा राजकारण आणि समाजकारणाकडेच आहे. (Savitri Jindal Net Worth)

ओपी जिंदाल यांचा २००५ मध्ये विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यानंतर या समुहाची विभागणी त्यांच्या चारही मुलांमध्ये करण्यात आली. सज्जन जिंदाल या मोठ्या मुलाला पोलाद उद्योगाचा ताबा मिळाला. तर सगळ्यात धाकटा मुलगा नवीन जिंदालकडे ऊर्जा उद्योगाचा ताबा आहे. पण, समुहाच्या प्रमुखपदी सावित्री जिंदालच राहिल्या. सज्जन जिंदाल हे करारी उद्योगपती म्हणून ओळखले जातात. तर नवीन जिंदाल यांना आईप्रमाणेच राजकारणात रस आहे. (Savitri Jindal Net Worth)

(हेही वाचा- Star – Reliance Merger : व्हायकॉम १८ आणि डिस्नी स्टार विलिनीकरणाच्या अटी काय? नवीन कंपनी कशी काम करणार?)

सावित्री जिंदाल जवळ जवळ २० वर्षं काँग्रेस पार्टीच्या सदस्य होत्या. भूपिंदर सिंग हूडा यांच्या हरयाणा सरकारमध्ये त्या मंत्रीही राहिलेल्या आहेत. पण, अलीकडेच त्यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. त्यांचा मुलगा नवीनही भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय आहे. (Savitri Jindal Net Worth)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.