राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट असून, या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढू लागले आहेत. गावपातळीवर रुग्ण संख्या वाढत असल्याने आता काही गावातील तरुण-तरुणीच मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. असाच एक आदर्श सध्या घालून दिला आहे सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव आणि कुणकेरी या दोन गावातील तरुण-तरुणींनी.. गावात आणि तालुक्यातील वाढणारी कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता तसेच ऑक्सिजनसाठी होणारी धावपळ बघता या दोन्ही गावातील तरुण-तरुणींनी पुढाकार घेत चक्क 80 हजार रुपये किमतीची ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी केली आहे.
असे जमवले पैसे!
सुरुवातीला इतकी महाग मशीन घेणार कशी, असा प्रश्न पडला. यासाठी काही तरुण आणि शिक्षक पुढे सरसारवले. त्यांनी गावात राहणारे आणि दोन्ही गावांतील मुंबई तसेच इतर शहरात कामानिमित्त बाहेर असणाऱ्या सर्वांना मदतीसाठी आवाहन केले. या आवाहनाला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्याचमुळे कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांची मदत न घेता या दोन्ही गावातील तरुण-तरुणींनी दोन गावांसाठी एक मशीन खरेदी केली. ग्रामीण भागात वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशा वेळी खचून न जात आंबेगाव आणि कुणेकर या गावातील युवकांनी त्यावर पर्याय शोधून काढला आणि निधी संकलन करून ऑक्सिजन काँसंट्रेटर गावासाठी खरेदी केला.
(हेही वाचा : औरंगाबादमधील मराठा आंदोलकांचा मुंबईत एल्गार!)
Join Our WhatsApp Community