SBI ला लहानशी चूक पडली महागात; 85 हजारांची द्यावी लागणार नुकसान भरपाई

96

देशातील सर्वात मोठी असणारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेने दोन वर्षांपूर्वी केलेली एक लहानशी चूक बँकेला चांगलीच महागात पडली आहे. या चुकीबद्दल स्टेट बँकेला ग्राहकाला आता नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. एसबीआयच्या कर्मचाऱ्याला चेकवरील क्रमांक व्यवस्थित वाचता आला नाही. त्यामुळे त्याने चेक रिटर्न पाठवला असता संबंधित ग्राहकाने तक्रार निवारण मंचाकडे मदत मागितली. यानंतर मंचाने बँकेला तब्बल 85 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

(हेही वाचा – पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या)

काय आहे प्रकरण

कर्नाटकातील हुबळी शहरात एका महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक वादिराजाचार्य इनामदार यांनी वीज बिल भरण्यासाठी एक चेक दिला होता. ६ हजार रुपयांचा स्टेट बँकेचा तो चेक होता. हुबळी इलेक्ट्रॉनिक सप्लाय कंपनी लिमिटेडच्या नावाने हा चेक ३ सप्टेंबर २०२० रोजी काढण्यात आला होता. हुबळी इलेक्ट्रॉनिक सप्लाय कंपनीचे बँक खाते कॅनरा बँकेत असल्याने हा चेक वटवण्यासाठी स्टेट बँकेच्या शाखेत पाठवण्यात आला. त्यानंतर हा प्रकार घडला.

यानंतर कॅनरा बँकेने हा चेक उत्तर कन्नड जिल्ह्यातील हलियाल येथील स्टेट बँकेत पाठवला. या चेकवर कन्नड भाषेत रक्कम लिहिली होती. त्यामुळे स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याने कन्नड मधील ६ अंकाला ९ समजले. हा अकं चेकवरील तारखेच्या महिन्याच्या कॉलममध्ये नमूद केला होता. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्याने हा चेक जून महिन्यातील समजला आणि पुन्हा रिटर्न केला. चेक रिटर्न केल्याने प्राध्यपक इनामदार यांनी आपली ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या तक्रारीवर दोन वर्षानंतर निकाल जाहीर करण्यात आला. ग्राहक तक्रार निवारण मंचाने या प्रकरणाची दखल घेत स्टेट बँकेला ८५ हजार ११७ रूपयांचा दंड ठोठवला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.