-
ऋजुता लुकतुके
भारतीय बँकिंग क्षेत्रात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रोबेशनरी ऑफिसर अर्थात परिविक्षाधीन अधिकाऱ्याची नोकरी ही प्रतीष्ठेची मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेची तयारी करतात. बँकांसाठीची पीओ परीक्षा ही देशपातळीवर होणारी आणि सारखीच परीक्षा असते. ती उत्तीर्ण होणारे उमेदवार राष्ट्रीयीकृत बँक निवडू शकतात. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असं या परीक्षेचं स्वरुप असतं. एखाद्या विषयाच्या ज्जानाबरोबरच, नेतृत्व गुण आणि विश्लेषणात्मक कौशल्याचीही पारख या परिक्षेतून केली जाते. (SBI PO Salary)
वयाची २१ वर्ष पूर्ण झालेला आणि ३० वर्षांच्या आतील भारतीय नागरिक या परिक्षेला बसू शकतो. अर्थात, उमेदवाराने स्नातक परीक्षा उत्तीर्ण केलेली असली पाहिजे. खुल्या आणि इतर प्रवर्गांसाठी पात्रतेच्या अटी या काही प्रमाणात वेगळ्या असू शकतात. त्यामुळे मागासवर्गीय प्रवर्गाला वय मर्यादेतून ५ वर्षांची सूट आहे. तर दिव्यांगांना सर्वाधिक १५ वर्षांची सूट आहे. एक व्यक्ती जास्तीत जास्त ४ वेळा ही परीक्षा देऊ शकतो. इतर प्रवर्गांसाठी ही अट ४ प्रयत्नांनी शिथील करण्यात आली आहे. (SBI PO Salary)
(हेही वाचा- उत्तम शिक्षणासाठी Madarsa चुकीचे ठिकाण; बाल हक्क आयोगाची सर्वोच्च न्यायालयासमोर स्पष्टोक्ती)
स्टेट बँकेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्याला महिन्याला ५२,८२० रुपये इतका पगार मिळतो. मूलभूत पगार ४१,९६० रुपये इतका आहे. पण, यात विविध प्रकारचे भत्ते जमा होऊन पगार ५२,००० च्या वर जातो. (SBI PO Salary)
स्टेट बँकेच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्याचा मासिक पगार (रुपयांमध्ये) |
|
मूलभूत पगार |
४१,९६० |
विशेष भत्ता |
६,६८१ |
महागाई भत्ता |
१२,७०१ |
शैक्षणिक भत्ता |
६०० |
निवासी भत्ता |
७०० |
स्थूल उत्पन्न |
६५,७८० |
वजावट |
१२,९६० |
निव्वळ उत्पन्न |
५२,८२० |
स्टेट बँकेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या या मोठ्या आहेत. बँकेचं कामकाज आणि प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू ठेवणं ही या अधिकाऱ्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. बँकेचं कर्जवितरण आणि गहाणवट प्रक्रियेवर नीट लक्ष ठेवणं, ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी प्रयत्न कऱणं, कर्जाची वसुली वेळेवर करण्यासाठी व्यवस्था लावणं अशी कामं या अधिकाऱ्याला करायची असतात. बँक खात्याचा जनसंपर्क अधिकारी म्हणूनही परिविक्षाधीन अधिकारीच काम करतो. (SBI PO Salary)
(हेही वाचा- Coastal Road : दक्षिणेकडे जोडणाऱ्या पुलाची मार्गिका येत्या शुक्रवारी १३ सप्टेंबर पासून होणार खुली )
यावर्षी साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात या परीक्षा आणि निवड प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. (SBI PO Salary)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community