प्रेशित मोहम्मद यांच्यासंदर्भातील वादग्रस्त विधानावरून सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मांना सुनावले होते. मात्र बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून नुपूर शर्मांना मोठा दिलासा मिळाला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत शर्मांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच, शर्मा यांच्याविरुद्ध दाखल सर्व एफआयआर दिल्लीत ट्रान्सफर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
(हेही वाचा – १५,००० नागरिकांचा सहभाग, १.२५ किलोमीटरचा तिरंगा; मुंबईत निघणार ‘भव्य तिरंगा यात्रा’)
देशभरात नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध नोंदवलेले खटले सर्वोच्च न्यायालयाने तपास यंत्रणेकडे सोपवले आहे. त्यामुळे सर्व प्रकरणांची दिल्लीत चौकशी केली जाणार आहे. जीवाला धोका असल्याने सर्व एफआयआर दिल्लीला ट्रान्सफर करण्यात आले आहेत.
Further, all the clubbed FIRs against Nupur Sharma have been transferred to Delhi Police for investigation.
— ANI (@ANI) August 10, 2022
शर्मा यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या सर्व एफआयआरमध्ये दिल्लीतील घडामोडींचा मोठा भाग आहे. भविष्यात एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्याचा अधिकार त्यांनी गमावला आहे, ज्यासाठी त्या दिल्ली उच्च न्यायालयात देखील जाऊ शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी ८ जून २०२२ रोजी एफआयआर नोंदवला होता. याचिकाकर्त्याच्या जीवाला आणि स्वातंत्र्याला असलेल्या गंभीर धोक्याची न्यायालयाने पूर्वीच दखल घेतली आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community