‘द केरला स्टोरी’ (The Kerala story) या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. केरळच्या डाव्या लोकशाही आघाडीने आणि काँग्रेसने चित्रपटावर हेटस्पीचला चालना देणे आणि ऑडिओ-व्हिज्युअल प्रपोगंडा असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या हस्तक्षेप याचिकेवर तातडीने सुनावणी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
(हेही वाचा –The Kerala story : इस्लामी जिहादला बळी पडलेल्या ३२ हजार महिलांची कथा )
न्यायमूर्ती केएस जोसेफ आणि बीव्ही नागरत्ना यांच्या खंडपीठाकडे अधिवक्ता निझाम पाशा आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मंगळवार २ मे रोजी या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. याचिकाकर्त्यांनी खंडपीठाला सांगितले की, हा चित्रपट (The Kerala story) शुक्रवार ५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे आणि चित्रपटाच्या ट्रेलरला आतापर्यंत १६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. निझाम पाशा यांनी न्यायालयाला सांगितले की, हा चित्रपट हेट स्पीचचे सर्वात वाईट आणि सर्वात खालच्या दर्जाचे उदाहरण आहे. हा चित्रपट केवळ ऑडिओ-व्हिज्युअल प्रपोगंडा आहे.
हेही पहा –
यावर उत्तर देताना सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, हेटस्पीचचे अनेक प्रकार आहेत. असे नाही की कोणीतरी अचानक व्यासपीठावर जाऊन रँडमली हेटस्पीच पसरवत आहे. चित्रपटाला (The Kerala story) सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले असून सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली आहे. आम्ही या चित्रपटावर कोणताही टॅग लावू शकत नाही. चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निर्णयाला आव्हान द्यायचे असेल तर योग्य व्यासपीठ आणि फोरममधून प्रयत्न करावेत असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने ‘द केरला स्टोरी’वर बंदीची मागणी फेटाळून लावली.
Join Our WhatsApp Community