केंद्राचा मोठा निर्णय! मदरशांमध्ये इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती बंद

192

मदरशांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्कॉलरशीपवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने मदरशांमध्ये इयत्ता पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 1 हजार रूपयांची शिष्यवृत्ती मिळत होती. तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कोर्ससंदर्भात शिष्यवृत्ती देण्यात येत होती.

(हेही वाचा – कामाख्या देवीला केलेल्या प्रार्थनेमुळेच राज्यातील सरकार पडणार, ‘सामना’ तून सरकारवर टीकास्त्र)

या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कायम

केंद्राच्या मते, देशात शिक्षणाच्या अधिकाराअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक इतर सामग्री देखील दिली जाते. इतकेच नाही तर मदरशांमध्ये मध्यान्ह भोजन तसेच पुस्तक फ्रीमध्ये दिली जातात. तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची गरज नाही, त्यामुळे केंद्राने मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना दिली शिष्यवृत्ती यापुढे कायम राहणार आहे.

दरम्यान, केवळ एकट्या उत्तर प्रदेशात 16 हजारांहून अधिक मदरशांमध्ये साधारण 4 ते 5 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. यावेळी नोव्हेंबरमध्ये मदरशांमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल केले आहेत. पण केंद्राने अचानक शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राज्य सरकारने यापूर्वीच या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी योगी सरकारने मदरशांचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये ८ हजार ४९६ मदरसे मान्यताप्राप्त नसल्याचे आढळून आले होते. सर्वेक्षणामध्ये या मदरशांच्या कमाईचा स्त्रोत देणगी असल्याचे दाखवण्यात आले होते. आता योगी सरकार मदरशांच्या मिळकतीच्या स्त्रोतांचा तपास करण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.