अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांची स्कूल बस उलटली; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

102

अंबरनाथच्या रोटरी शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी मिनी स्कूल बस सकाळी पावणेसातच्या सुमारास उलटल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी या बसमध्ये १७ ते १८ विद्यार्थी होते.

चालकाच्या बेजबाबदारपणामुळे अपघात 

अंबरनाथच्या ग्रीन सिटी संकुलामध्ये हा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्कूल बस उलटल्यानंतर तातडीने स्थानिकांनी अपघातग्रस्त बसमधून विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले, यानंतर क्रेनच्या मदतीने पलटी झालेली बस हटवण्यात आली. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी बसवर चढून तातडीने सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढले. यामुळे दोन विद्यार्थ्यांना किरकोळ इजा झाली आहे.

( हेही वाचा : ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ हवाय? तिकीट आरक्षण करताना हा पर्याय नक्की निवडा)

स्थानिक पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलंं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या बसचा विमा सुद्धा नव्हता तसेच बसची अवस्थाही अतिशय मोडकळीस आलेली होती. चालकाच्या बेजबाबदार ड्रायव्हिंगमुळे हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. उतारावर स्कूल बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे स्कूल बसची वाहतूक करणाऱ्यांवर तसेच मुलांच्या सुरक्षेतबाबत पुन्हा एकदा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.