चिंतेची बाब! सिगारेटपेक्षा ‘या’ पदार्थांची शाळकरी विद्यार्थ्यांना ओढ

105

शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हा चिंतेचा विषय बनला आहे. शाळकरी मुले आता सिगारेटसारखे थेट व्यसनात अडकण्यापेक्षा हुक्काच्या आहारी जास्त जात असल्याचे सर्वेक्षणाअंती अधोरेखित झाले आहे. राज्यात ४ हजार ३६० विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्यावतीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती उघडकीस आली. ग्लोबल एडल्ट टॉबेको सर्वेची चौथी फेरी २०१९ साली आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञानच्यावतीने राज्यात घेतली गेली होती. या सर्वेक्षणाचा अहवाल परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयात प्रकाशित करण्यात आला. किशोरवयातच मुलांना लागणारी व्यसनाची ओढ पाहता यावर आळा घालण्यासाठी होणा-या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यात सर्वस्तरांतून दबावतंत्र वापरण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

सर्वेक्षणाबद्दल…

२०१९ साली आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेने राज्यभरातील ४ हजार ३६० विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाबाबत सर्वेक्षण केले. यात ३५ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ९ सरकारी तर २० खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. १३ ते १५ वयोगटातील ३ हजार ६७५ विद्यार्थ्यांना प्रामुख्याने तंबाखू व्यसनाशी संबंधित सर्वेक्षणात प्रश्नोत्तरे विचारली गेली.

काय सांगतंय सर्वेक्षण

० ५.१ टक्के शाळकरी मुले तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन पसंत करतात. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यात मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसन दिसून आले. ४ टक्के मुले हुक्क्यातला धूर ओढण्याला पसंती देतात. यात मुलांपाठोपाठ मुलींचीही संख्या लक्षणीय आहे. मुलांमध्ये हुक्का ओढण्याचे प्रमाण ४.४ तर मुलींमध्ये ३.४ टक्के आहे. हुक्क्याच्या आहारानंतर मुलांना तंबाखूजन्य पदार्थांचे वेड लागल्याचेही सर्वेक्षणाअंती अधोरेखित करण्यात आले. त्याखालोखाल सिगारेट आणि बिडीकडे मुले आकर्षित होत असल्याचेही आढळून आले. १.४ टक्के मुले ही सिगारेटच्या आहारी केली आहेत. तर १.६ टक्के दोन्ही मुलेमुली बिडी ओढण्याला एकसमान पसंती देत आहेत.

महत्त्वाचे…

० ४ हजार ३६० मुलांपैकी २४ टक्के मुलांनी धूम्रपानाचे व्यसन कायमचे सोडले.
० गेल्या वर्षभरात २० टक्के मुलांनी व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. यात २८ टक्के मुले तर ७ टक्के मुलींचा समावेश आहे.
० गेल्या वर्षभरात २० टक्के मुलांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून स्वतःला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
० १६ टक्के मुलांना आता व्यसनापासून स्वतःला दूर करायचे आहे.

तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन कुठे जडले

२२ टक्के मुलांना सार्वजनिक स्थळावर तंबाखूचे व्यसन जडले. तर ७.८ टक्के मुलांना घरी सवय लागली. यातील ६३ टक्के मुले पान विक्रेता, दुकान किंवा फेरीवाल्याकडून तंबाखून्य पदार्थ विकत घेतात

तंबाखूजन्य घटकांची तपासणी करा

अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम राज्यांच्या तुलनेत राज्यातील विद्यार्थी वयोगटातील मुलांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवन करण्याचे प्रमाण केवळ ५.१ टक्के आहे. मात्र १३ ते १५ वयोगटातील तंबाखूचे व्यसन घालवण्यासाठी तंबाखू जन्य पदार्थांची देशभरात तपासणी होणे आवश्यक आहे, टाटा कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ राजेंद्र बडवे यांनी सांगितले.

तंबाखूजन्य पदार्थांची मागणी व पुरवठा कमी करण्यासाठी कोट्या कायद्याची प्रभावी आणि कडक अंमलबजावणी केली पाहिजे. त्यात जनतेने सक्रीय सहभाग घ्यावा. तंबाखूजन् पदार्थ्यांच्या वापरामुळे आरोग्यावर होणा-या दुष्परिणामावर शाळेकडून जनजागृती कार्यक्रम हाती घेतले जावे

– आरोग्यमंत्री राजेश टोपे असे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.