मुंबईत शाळा बंद पण पुण्यात शाळा सुरूच! काय म्हणाले महापौर…

97

वाढत्या रूग्ण संख्येमुळे मुंबईतील शाळांसंदर्भात मुंबई महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या निर्णयानुसार, मुंबईतील इयत्ता 1 ली ते 9 वीच्या शाळा पुन्हा एकदा ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ३१ जानेवारीपर्यंत मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद राहणार आहेत. मात्र पुण्यात तूर्तास तरी शाळा बंदचा निर्णय नाही, असे पुणे महापौर मुरलीधऱ मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर नव्या निर्बंधांबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही महापौर यावेळी म्हणाले. तर मुंबई आणि इतर परिसर वगळता राज्यातील इतर भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्यातील शाळा बंद न करता नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.

पुण्यात रविवारी कोरोनाचे 524 नवे रुग्ण आढळून आले. तसेच 36 ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळल्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात होती. या अनुषंगाने सोमवारी महापौर मुरलीधर मोहोळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. या वेळी महापौर यांनी असे सांगितले की, पुण्यात 27 डिसेंबरपासून ते कालपर्यंत बाधितांची संख्या ही अडीच हजारांच्या घरात होती. त्यामुळे महापालिकेत यासंदर्भात बैठक झाली. पुण्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्णांमध्ये तीव्र लक्षणं नाहीत. ओमायक्रॉनचे 27 रुग्ण आहेत. यामध्ये दोन्ही डोस घेतलेले 70 ते 75 टक्के लोक आहेत. त्यामुळे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या 80 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, असेही महापौरांनी सांगितले.

(हेही वाचा – महापालिकेचा मोठा निर्णय: मुंबईतील १ ली ते ९ वीच्या शाळांना ३१ जानेवारीपर्यंत टाळे!)

पुण्यात आजपासून देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरु होत आहे, पुणे शहरात ही या लसीकरण मोहिमेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुण्यात आजपासून 40 लसीकरण केंद्रांवर 15 ते 18 वयोगयातील मुलांसाठी कोरोना लसीकरण होणार आहे. यासाठी पुणे मनपाने या वयोगटातील 2 लाख मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे, पुण्यातील शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटलमध्ये आज 15 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण मोहिमेचे उदघाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोनाची साथ रोखण्यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार पुण्यात आजपासून 40 लसीकरण केंद्रांवर 15 ते 18 वयोगयातील मुलांसाठी कोरोना लसीकरण करण्याचे पुणे महानगरपालिकेने ठरवले आहे. आज पासून आम्ही या मोहिमेची सुरुवात करत आहोत, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.