शास्त्रज्ञांनी शोधला नवा ग्रह, ‘नासा’ने केले ट्विट

अवकाशात कायम नवनवीन घडामोड टिपण्यामागे नासाचे शास्त्रज्ञ सतर्क असतात. त्याच बरोबर आपल्या पृथ्वीसारखाच दुसरा कोणता ग्रह या ब्रह्मांडात आहे का, याचाही शोध घेत असतात. या शोध कार्यात काही प्रमाणात शास्त्रज्ञांना यश आले आहे. तसे ट्विट नासाने केले आहे.

पृथ्वीपासून किती लांब आहे ग्रह? 

पृथ्वीवर जसे पाणी आहे, जीवसृष्टी आहे, तसा दुसरा कोणता ग्रह अस्तित्वात आहे का, याविषयी खगोलशास्त्रज्ञांना कायम कुतूहल असते. यासंबंधीच्या शोधासाठी याबाबत वेळोवेळी अनेक अपडेट समोर आले आहेत. पृथ्वीसारख्या ग्रहाचा शोध सुरू असतानाच खगोलशास्त्रज्ञांनी एका नवीन ग्रहाचा शोध लावला आहे. खगोलशास्त्रज्ञांनी ‘सुपर अर्थ’ शोधली आहे. या ग्रहाच्या पृष्ठभागावर पाणी टिकून राहिल, अशी अपेक्षा आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने विज्ञान कार्य सुरू केल्यामुळे भविष्यातील निरीक्षणांसाठी हे महत्त्वाचे लक्ष्य असू शकते. पण हा ग्रह राहण्यायोग्य क्षेत्रामध्ये आणि बाहेर फिरत राहतो. नवीन ग्रह पृथ्वीपासून सुमारे 37 प्रकाश-वर्षे अंतरावर स्थित आहे. हा ग्रह स्वतः पृथ्वीच्या वस्तुमानाच्या चौपट आहे, त्याच्या मध्यवर्ती ताऱ्यापासून पृथ्वी-सूर्य अंतराच्या सरासरी अंतर 0.05 पट आहे. नव्याने शोधलेल्या एक्सोप्लॅनेटचे वस्तुमान पृथ्वीच्या जवळपास चौपट आहे आणि नवीन इन्फ्रारेड मॉनिटरिंग तंत्र वापरून शोधण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here