जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीवरील सजीवसृष्टी संकटात सापडलेली असताना जगभरातील शास्त्रज्ञांनी आर्टिक्ट महासागरात केलेल्या संशोधनातून आशेचा किरण निर्माण झाला आहे. कोरोनाच्या काळात जगभरात लॉकडाऊन झालेले असताना एका बोटीत अडकलेल्या शास्त्रज्ञांनी आर्टिक्ट महासागरातील ओझोनच्या थराचा अभ्यास केला. ओझोनच्या पृष्ठभागावरील थरात आयोडिन या प्रदूषकाचे प्रमाण वाढल्याचे शास्त्रज्ञांना आढळले. सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीला वाचवणा-या ओझोनच्या थरात आयोडिनचे प्रमाण वाढल्यास तापमानवाढ रोखली जाण्याची आशा असल्याचे शास्त्रज्ञांच्यावतीने सांगण्यात आले. गुरुवारी, जागतिक ओझोन दिननिमित्ताने याबाबतीतीतल संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध करण्यात आले.
(हेही वाचा – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत उदय सामंतांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “केवळ चर्चा, लेखी व्यवहार…”)
ओझोनचा सर्वात खालचा थर जमिनीला लागून असतो. जमिनीच्या पृष्ठभागाला लागून असलेल्या या थरात गेल्या काही वर्षांत ओझोनच्या थराचा मोठ्या प्रमाणात -हास झाला होता. या थरांत वातारणातील रसायनांचा कितपत परिणाम होतो, याचा तब्बल २०० शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. २० देशांतील शास्त्रज्ञांनी आर्टिक्ट महासागरात एका बोटीवर आळीपाळीने राहून वातावरणातील बदलांची तपशीलवार माहिती घेतली. जागतिक पातळीवरील या संशोधनाला ‘मल्टिडिसिप्लिनरी ड्राफ्टिंग ऑब्झर्वेटरी फॉर द स्टडी ऑफ आर्टिक क्लायमेट’ असे नाव देण्यात आले. या संशोधनात पुण्यातील ‘इंडियन इन्सिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिरिओलॉजी’ (आयआयटीएम)चे शास्त्रज्ञ डॉ. अनुप महाजन यांनीही सहभाग नोंदवला.
शास्त्रज्ञांचे निरीक्षण
गेल्या काही वर्षांत जगभरात ओझोनच्या जमिनीला लागून असलेल्या पृष्ठभागाच्या थराला हानी पोहोचू लागली आहे. परिणामी, वाढत्या अतिनील सूर्यकिरणांमुळे शेतीपिकावर आणि मानवी शरीरावरही परिणाम दिसून येत आहे. अशातच २०२० ते २०२१ या वर्षभराच्या काळात शास्त्रज्ञांनी आर्टिक्ट महासागरात केलेल्या संशोधनात ओझोनचा थर वाचवण्यात आयोडिन थर मदत करत असल्याचे दिसून आले. आयोडिनचे प्रमाण वाढत असले तरीही वातावरणातील ओझोनचा थर नेमका कितपत सुरक्षित आहे, याचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले.
वातावरणात आयोडिनचे प्रमाण का वाढले
जागतिक तापमानवाढीचा थेट परिणाम समुद्रातील पृष्ठभागावर होत आहे. समुद्रातील प्रदूषणकांमध्ये आयोडिन प्रामुख्याने आढळून येते. हे आयोडिन वातावरणातील पहिल्या जमिनीच्या पृष्ठभागाला लागून असलेल्या ओझोनच्या थरात साचत आहे.
Join Our WhatsApp Community