कोविड विषाणू चिनी लॅबमध्येच तयार झाला? ‘त्या’ शास्त्रज्ञांचे वुहान कनेक्शन आले समोर

वुहान शहरात गेलेल्या शास्त्रज्ञांपैकी काही शास्त्रज्ञांचे वुहान कनेक्शन समोर येत आहे.

मागच्या दोन वर्षांपासून जग कोरोनामुळे मृत्यूच्या सावटाखाली जगत आहे. जगभरातील जवळजवळ करोडो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे जगाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानाचा देखील सामना करावा लागत आहे.

या जीवघेण्या रोगाचा पहिला रुग्ण चीनच्या वुहान शहरात सापडला. त्यामुळे या व्हायरसचा नेमका उगम कसा आणि कुठून झाला याचा शोध लावण्यासाठी काही शास्त्रज्ञांची टीम गेल्यावर्षी चीनच्या वुहानस्थित लॅबमध्ये गेली होती. हा व्हायरस नेमका चीनमध्येचं निर्माण झाल्याचं काही ठोस कारण न सापडल्याने या व्हायरसच्या संदर्भातील ब-याचशा गोष्टी अनुत्तरित राहिल्या. पण, आता मात्र वुहान शहरात गेलेल्या शास्त्रज्ञांपैकी काही शास्त्रज्ञांचे वुहान कनेक्शन समोर येत आहे. त्यामुळेच चीनचं पारडं जड राहील असाच निर्णय त्यांच्याकडून दिला गेल्याचं ‘द टेलीग्राफ’ या वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

शास्त्रज्ञांचे चिनी कनेक्शन

चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (डब्ल्यूआयव्ही) मधून कोविड-19 व्हायरस लीक झाल्याचा सिद्धांत नाकारणाऱ्या शास्त्रज्ञांचा वुहानच्या कुप्रसिद्ध प्रयोगशाळेशी संबंध आहे, असं या मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
द लॅन्सेटमध्ये गेल्या वर्षी 7 मार्च रोजी लॅब-लीक सिद्धांत नाकारणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या शास्त्रज्ञांचे चिनी संशोधक, त्यांचे सहकारी किंवा फंडर्सशी संबंध होते, असे द टेलीग्राफने म्हटले आहे.

संशोधनासाठी पुरवला निधी

ज्या 27 शास्त्रज्ञांनी ‘द लॅन्सेट’ या पत्रकावर स्वाक्ष-या केल्या होत्या त्यापैकी एक डॅस्झॅक हे अमेरिकेच्या नॉन-प्रॉफिट इकोहेल्थ अलायन्सचे अध्यक्ष आहेत ज्यांचा चीनशी थेट संबंध आहे. या फर्मने डब्लूआयव्ही मध्ये संशोधनासाठी निधी देखील दिला आहे. त्यामुळेच या गोष्टी लक्षात घेता, कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक जेफ्री सॅक्स यांनी केवळ लॅन्सेट जर्नलच नाही तर कोविड-19 च्या उत्पत्तीचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञांचे टास्क फोर्स खंडित केले आहे.

चीनच्या वुहान शहरात कोविड-19 पहिल्यांदा सापडल्यानंतर जवळपास दोन वर्षांनंतरही व्हायरसच्या उत्पत्तीचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. अनेक शास्त्रज्ञांनी आणि सरकारांनी जागतिक स्तरावर याबाबत अनेक दावे केले आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here