पीएफआयप्रमाणे एसडीपीआयवर बंदी घालावी – हिंदू जनजागृती समिती

केंद्र सरकारने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ अर्थात् ‘पी.एफ्.आय.’वर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याद्वारे (UAPA) बंदी घातली. या निर्णयाचे हिंदू जनजागृती समिती स्वागत करते. ‘पी.एफ्.आय.’चा अनेक राष्ट्रविरोधी आणि आतंकवादी कारवायांमध्ये, तसेच हिंदू नेत्यांच्या हत्यांमध्ये सहभाग आढळून आला आहे. हिंदू जनजागृती समितीने गेली काही वर्षे आंदोलने, निवेदने, सोशल मीडिया कॅम्पेन आदींच्या माध्यमांतून ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याची मागणी लावून धरली होती. देशात नवरात्री चालू आहे आणि त्यातच ‘पी.एफ्.आय.’सह नऊ राक्षसी जिहादी संघटनांना संपवण्यात आले आहे. आता ‘पी.एफ्.आय.’ची राजकीय संघटना असलेल्या ‘एस्.डी.पी.आय.( Social Democratic Party of India)’वर बंदी आणून ‘दसरा’ साजरा करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वर बंदी घालत त्याला फरार आतंकवादी घोषित केले होते. मात्र याच आतंकवाद्याची ट्वीटर आणि फेसबुक या सामाजिक माध्यमांवर ५० हून अधिक खाती चालूच आहेत. याचप्रकारे आता ‘पी.एफ्.आय.’ आणि संलग्न संस्था यांवर जरी बंदी आणली असली, तरी त्यांचीही ट्वीटर आणि फेसबुक खाती अजूनही चालू आहेत. या बंदीमुळे आतंकवादी कारवाया नक्कीच थांबतील. मात्र आतंकवादी विचारसरणी पसरवण्याचे कार्य चालूच राहिल. जर यांचा सोशल मिडीयावर दहशतवादाचा प्रसार चालू राहिला, तर देशात अराजक माजवण्यासाठी त्याचा वापर होईल आणि प्रत्यक्ष घातलेल्या या बंदीला काही अर्थ रहाणार नाही. त्यामुळे ‘पी.एफ्.आय.’ आणि तिच्याशी संलग्न सर्व संघटनांची ट्वीटर आणि फेसबुक, तसेच अन्य सोशल मिडीया अकाऊंटही तत्काळ बंद घातली  पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी आहे.

( हेही वाचा: …तर महापालिका निवडणुकीत शिंदे-ठाकरे दोघांनाही गमवावा लागेल पक्ष आणि चिन्ह – माजी निवडणूक आयुक्त )

अशा लोकांवर देशद्रोहाचे खटले दाखल करा

पुण्यात नुकतेच ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, त्यामध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. असे प्रकारही आता मोठ्या प्रमाणात होतील. तरी अशा घोषणा देणा-यांवरही देशद्रोहाचे खटले दाखल करावेत, अशीही समितीने मागणी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here