सेबीचे ईमेल अकाउंट हॅक, हॅकरकडून पाठविण्यात आले ३४ जणांना मेल

93

‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया'(सेबी)या संस्थेचे ईमेल खाते अज्ञात हॅकरने हॅक करून या खात्यावरून ३४ जणांना ईमेल करण्यात आला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात अज्ञात हॅकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेबी संस्थेचे ई-मेल खाते हॅक 

सेबी ही संस्था भारत सरकारची असून ही संस्था देशातील भांडवल बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या संस्थेचे मुख्यालय मुंबईतील बीकेसी येथे आहे. भारतातील गुंतवणुकदार कंपन्या, शेअर्स मार्केटसह भारतातील इतर लहान मोठे फायनान्स कंपन्यांवर सेबीचे नियंत्रण असते. बीकेसी येथील मुख्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेबीचे अधिकृत ईमेल खाते देण्यात आलेले आहेत. त्यापैकी अकरा अधिकाऱ्यांचे ईमेल खाते मे महिन्यात हॅक करण्यात आलेले असून या अधिकृत ईमेल वरून हॅकरने वेगवेगळ्या कंपन्यांना स्वतःला सेबीचे अधिकारी असल्याचे भासवून मेल पाठवण्यात आले असल्याचे नुकतेच समोर आले आहे.

( हेही वाचा : बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करत तोडगा काढणे आवश्यक!)

या अधिकृत ईमेल मध्ये कार्यालयात चालणाऱ्या महत्वाच्या कामांची गोपनीय माहिती ठेवण्यात येते असे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सेबीचे सायबर सिक्युरिटीचे काम बघणारे माहिती तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांनी बिकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बिकेसी पोलिसांनी अज्ञात हॅकर विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.