धक्कादायक! पुण्यातील नवले पुलावर ३ दिवसात दुसरा अपघात

सौजन्य : न्यूज १८ लोकमत

पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. भरधाव वेगात येणारा ट्रक रस्त्याच्यामधील दुभाजकावर धडकल्यामुळे दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. हा ट्रक कात्रजच्या दिशेने मुंबईकडे जात होता. रविवारी झालेल्या भीषण अपघातानंतर आता नवले पुलावर पुन्हा त्याच ठिकाणी अपघात झाला आहे.

( हेही वाचा : SBI बॅंकेत काम करण्याची सुवर्णसंधी; मिळेल ६३००० पर्यंत पगार, असा करा अर्ज! )

३ दिवसात दुसरा अपघात 

नवेले पुलावरील तीव्र उतारामुळे हे अपघात होत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यावर आता महामार्ग प्रशासनाने महामार्गावरील उतारावर सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्त्याची जोपर्यंत पुनर्बांधणी होत नाही तोपर्यंत ही अपघातांची मालिका संपणार नसल्याचे मत स्थानिकांनी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना व्यक्त केले.

दरम्यान, नवले पुलाजवळ ४७ वाहनांना धडक देणाऱ्या ट्रक चालकाला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. चाकण येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. नवले पूल परिसरात रविवारी रात्री झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले. या प्रकरणी ट्रक चालक मणीराम छोटेलाल यादव (रा. मध्य प्रदेश) याच्या विरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इंधन वाचवण्याच्या नादात ट्रक चालकाने उतारावर ट्रक न्यूट्रल केल्याने हा भीषण अपघात घडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here