मुंबईत सलग दुस-या दिवशीही पावसाचा जोर दिसून आला. पाऊस रात्रभर कोसळल्याने सकाळीच जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी दोन- तीन तासांसाठी मुंबईत काही भागांत पावसाने ब्रेक घेतला. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबईतील काही भागांत सायंकाळी साडेपाचपर्यंत शंभर मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर वाढत असल्याने मुंबई विमानतळ परिसरात कमाल तापमान थेट २४.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. मुंबईतील जुलै महिन्यातील कमाल तापमानाची ही दशकभरातील सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली.
कमी तापमानाची नोंद
सायंकाळच्या साडेपाचच्या नोंदीत सांताक्रूझ येथे १५३.३ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल वांद्रे, दादर, बोरिवली येथे पावसाची नोंद झाली. दादरला दुपारी एक वाजेपर्यंत १०३ मिमी पाऊस पडला होता. वांद्रे येथे सायंकाळी साडेपाच वाजता १५३.३ मिमी, जुहू विमानतळ परिसरात १२१.५ मिमी, राम मंदिरात १००.५, मुंबई विमानतळ परिसरात १४८.५, सायनला तर १५४.५ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत मंगळवारसाठी दुपारनंतर मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. सव्वा सात वाजता तीन तासांसाठी दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईत संततधार कायम राहील.
( हेही वाचा : NDRF आणि SDRF तैनात! अतिवृष्टीत मदत कार्यासाठी यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश)
पावसाच्या दिवसभरा्च्या सक्रियतेने सांताक्रूझ येथे चार अंशाने कमाल तापमानात घट झाली. सांताक्रूझ येथे २६.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाब्यातही तीन अंशाने कमाल तापमान खाली आले. कुलाबा येथे २७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले.
Join Our WhatsApp Community