अहमदनगरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. दहशतवादी कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत पोलीस सतर्क झाले आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची संख्या जास्त आहे. या भाविकांवरही करडी नजर ठेवण्यात येणार आहे. हे भाविक राहण्यासाठी रिसाॅर्ट किंवा हाॅटेल बुक करतात. यावेळी त्यांची तपासणी केली जाणार आहे. ओळखपत्र न पाहता लोकांना राहण्यासाठी रुम देणा-या हाॅटेल मालकांवरही कारवाई केली जाणार आहे.
देशभरातून असंख्य भाविक शिर्डीत येत असतात. त्यामुळे शिर्डी पोलिसांना मिळालेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलिसांनी सतर्कतेचे पाऊल उचलत अहमदनगर जिल्ह्यात कलम 144 लागू केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शिर्डीत हाय अलर्टवर जारी करण्यात आले आहे.
( हेही वाचा: कोकणातून परतीच्या प्रवासासाठी गाड्या फुल्ल; १२ सप्टेंबरपर्यंत पनवेल – चिपळूण विशेष डेमू सेवा )
Join Our WhatsApp Community