… म्हणून मुंबईत रविवारपासून जमावबंदी, आकाश कंदिलासह मिरवणुकांवरही बंदी

148

येत्या काही दिवसातच दिवाळी असून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान, मुंबई पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काही काळात मुंबईत सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता भंग करून मानवी जीवन व मालमत्तेस धोका पोहचवण्यात येणार आहे, अशा माहितीच्या आधारे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मुंबईत १६ ऑक्टोबरपासून पुढील १५ दिवस जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.

(हेही वाचा – ठाकरे गटाचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; म्हणाले, “चिन्ह-नाव देताना…”)

मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त संजय लाटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे आदेश बजावले आहेत. अशातच अंधेरी विधानसभेची होऊ घातलेली पोटनिवडणूक या सर्व पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. १६ ऑक्टोबरपासून पुढील १५ दिवस या कालावधीत जमावबंदीच्या आदेशासह मुंबईत कंदील उडवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. आकाशात कंदील उडवल्याने मानवी जीवन आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

या आदेशानुसार, १६ ऑक्टोबरपासून ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत १५ दिवस हे आदेश लागू राहणार आहेत. यात ५ किंवा अधिक व्यक्तीच्या एकत्रित येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, कोणतीही मिरवणूक आणि कोणत्याही मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड वाजविण्यास आणि फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाप्रमाणे कोणत्याही नियमांच्या उल्लंघनाच्या संदर्भात झालेला कोणताही दंड, शिक्षा, जप्ती हा आदेश कालबाह्य झाला नसल्याप्रमाणे लागू केली जाऊ शकते, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.