मुंबई विमानतळ उडवून देणार? धमकीचा आला E-Mail, सुरक्षा बंदोबस्तात वाढ

98

मुंबई विमानतळ उडवून टाकण्याचा धमकीचा ईमेल आला आहे. या धमकीच्या मेलने सर्वांचीच धास्ती वाढवली आहे. या मेलमध्ये असे म्हटले आहे की, विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. हा मेल मिळताच तातडीने विमानतळ प्राधिकरणाने विमानाची संपूर्ण तपासणी केली आहे.

यानंतर विमानतळावरील संपूर्ण सुरक्षा बंदोबस्तात वाढ कऱण्यात आली आहे. दरम्यान, हा मेल नेमका कुठून आला आणि कोणी पाठवला आहे. याचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

(हेही वाचा – फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा हिंसाचार! दोन क्लबचे समर्थक भिडले, 129 जणांचा बळी)

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर एक ईमेल आला, ज्यामध्ये इंडिगोच्या फ्लाईट क्रमांक 6E 6045 मध्ये बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते. हे विमान रात्री मुंबईहून अहमदाबादला जाणार होते. ईमेल आल्यानंतर तपासले. परंतु या इंडिगोच्या फ्लाईटमध्ये कोणतीही बेवारस वस्तू किंवा बॉम्ब सदृश वस्तू दिसून आली नाही.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.