जम्मू-काश्मिरात सुरक्षा दलांनी स्फोटकांनी भरलेले पाकिस्तानी ड्रोन उध्वस्त केल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानातून ऑपरेट होणाऱ्या या ड्रोनवर लागलेल्या स्फोटकांच्या माध्यमातून घातपात घडवण्याचे षडयंत्र आखण्यात आले होते. परंतु, सतर्क असलेल्या भारती सुरक्षा दलांनी हा डाव उधळून लावला.
ड्रोन सीमेपलिकडून भारतात दाखल
यासंदर्भात माहिती देताना जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, कठुआ जिल्ह्यातील राजबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तल्ली हरिया चाक भागात हा ड्रोन आकाशात घिरट्या घालत होता. हा ड्रोन सीमेपलिकडून भारतात दाखल होत होता. हा ड्रोन पाडल्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने त्याची कसून तपासणी केली. तपासणीनंतर या ड्रोनला 7 ‘अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर’ आणि 7 चिकट आणि मॅग्नेटिक बॉम्ब लावले होते. ही सर्व स्फोटके जप्त करण्यात आली असून याचा पुढील तपास बॉम्ब डिस्पोजल स्क्वाडकडून सुरु असल्याचे कठुआच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
(हेही वाचा – नेपाळमध्ये ४ मुंबईकरांसह २२ जणांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता!)
दहशतवाद्यांकडून छुप्या पद्धतीने कारस्थान
सीमावर्ती भागात जिहादी दहशतवाद्यांकडून अशा छुप्या पद्धतीने कारस्थान सुरु असतात. यामध्ये आता ड्रोनसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापरही वाढला आहे. रिमोट तंत्रज्ञानाने ऑपरेट केल्या जाणाऱ्या ड्रोनच्या माध्यमातून दहशतवादी सीमापार बसून भारतीय हद्दीत आपल्या कारवाया घडवून आणण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community