SEESCAP संस्थेचा ‘शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था २०२४’ पुरस्काराने सन्मान

111
SEESCAP संस्थेचा 'शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था २०२४' पुरस्काराने सन्मान
SEESCAP संस्थेचा 'शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था २०२४' पुरस्काराने सन्मान

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणारा गिर्यारोहण क्षेत्रासाठीचा ‘शिखर सावरकर पुरस्कार २०२४’ दि. ११ ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात आला. यावेळी ‘सिस्केप, रायगड(SEESCAP)’ या संस्थेला ‘शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था २०२४’ (Shikhar Savarkar Award 2024) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘ग्राऊंडवरील स्वयंसेवकांचा व्यासपीठावर सन्मान होणे हा आनंदाचा क्षण आहे, असे विधान सिस्केपच्या स्वयंसेवकांनी केले.’ स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. साहसी क्रीडा प्रकारांच्या माध्यमांतून संकटग्रस्त वन्यजीवांप्रती सद्भावपूर्ण पालकत्व स्वीकारून उभारलेल्या उल्लेखनीय सेवाभावी कार्याकरीता हा पुरस्कार सिस्केप (SEESCAP) संस्थेला देण्यात आला.

( हेही वाचा :  Mhada Lottery 2024 : सर्वसामन्यांसाठी खुशखबर! कोकण आणि पुणे मंडळाच्या 18,920 घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरु )

यावेळी संस्थेचे पदाधिकारी म्हणाले की, सर्वत्रप्रथम ‘रायगडमधील एका संस्थेची मुंबईसारख्या महानगरात सावरकर स्मारकाकडून दखल घेतली जाते, याबद्दल विशेष आनंद आहे. संस्थेचे ४० ते ४५ स्वयंसेवक या कार्यक्रमाला येण्यास इच्छुक होते. मात्र संस्थेच्या कामाचा आवाका पाहाता ते शक्य झाले नाही. ‘शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था २०२४’ हा पुरस्कार स्विकारत असताना मन भरून आले आहे. पण आमच्यासारख्या ग्राऊंडवर काम करणाऱ्यांना व्यासपीठावरून सन्मानित केल्याबद्दल सावरकर स्मारकाचे आम्ही आभारी आहोत.’ यावेळी संस्थेचे तरुण पदाधिकारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते.

‘सिस्केप’ (SEESCAP)संस्थेच्या कामाविषयी

गिर्यारोहणाच्या माध्यमातून साहसवाटांचा मागोवा घेत असतानाच पर्यावरणपूरक ज्ञानवाटा खुणावू लागतात. त्यावरील परिश्रमपूर्ण निसर्गस्नेही वाटचालीतून अविरत पर्यावरणसेवा घडावी, अशा उदात्त हेतूने सिस्केप संस्थेची उभारणी करण्यात आली. जीवसाखळीतील दुर्बल आणि दुर्लक्षित जीवदेखील आपल्या जीवसृष्टीचे अत्यावश्यक घटक असून त्यांचे रक्षण ही आपली जबाबदारी आहे, अशी प्रेमभावना आपल्या ठायी सदैव जागृत ठेवण्यासाठी सिस्केप (SEESCAP)संस्था काम करत असते.

दुर्लक्षित हिंस्र वन्य पशूपक्ष्यांसह अनेक संकटग्रस्त जीवांचे संरक्षण, संवर्धन आणि संगोपनाकरीता सिस्केप (SEESCAP) संस्थेने उभारलेले सेवाकार्य अतिशय प्रेरणादायी आहे. त्यामुळे सिस्केप (SEESCAP) संस्थांचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांचे कार्य इतरांसाठी कायम दिशादर्शक ठरणारे असेच आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.