गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ५ मराठी चित्रपटांची निवड

139
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘फिल्म मार्केट २०२२’मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पोटरा, तिचं शहर होणं, पांडीचेरी, राख आणि पल्याड या चित्रपटांचा त्यात समावेश असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केली.
या ५ मराठी चित्रपटांच्या निवडीसाठी ५ तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत निर्माती अभिनेत्री किशोरी शहाणे वीज, एफटीआयआयचे धीरज मेश्राम, युनेस्को चे ज्युरी मनोज कदम, चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर, चित्रपट लेखक व दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांचा समावेश होता. या समितीने दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे २५ चित्रपटांचे परीक्षण करीत, या ५ चित्रपटांची निवड केली आहे. हे चित्रपट गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवासाठी प्रत्येक चित्रपटाचे दोन प्रतिनिधी याप्रमाणे ५ चित्रपटाचे १० प्रतिनिधी पाठविण्यात येणार आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.