आरोग्यासाठी पायी चालणे चांगले असते, असे डाॅक्टर अनेकदा सांगतात. मात्र, ब्रिटनमधील लोकांमध्ये स्वत:हून पायी चालण्याचे प्रचलन वाढत आहे. लोकांना पायी चालण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी काही मुख्य रस्त्यांवर चित्रे काढण्यात आली आहेत. त्यातून लोकांना पायी चालण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
बर्मिंगहॅम येथे डिजिटल जाहिरात फलकांमुळे त्यावर चालणे कठीण झाले आहे. परंतु सरकार संपूर्ण ब्रिटनमध्ये लोकांना पायी चालण्यास प्रोत्साहन देत आहे. साथीच्या रोगाने घडवून आणलेल्या बदलांपैकी हा एक आहे, असे बर्मिंगहॅममधील नगरसेवक लिसा ट्रिकेट यांनी सांगितले.
( हेही वाचा: नागपूरचे हिवाळी अधिवेशन यंदा दोन आठवड्यांचे? )
सरकार चालण्याला प्रोत्साहन देतंय
- 2019 ते 2021 दरम्यान लोकांनी मोठ्या प्रमाणात पायी प्रवास केला. कार आणि दुचाकीच्या प्रवासात घट झाली आहे. एक मैलापेक्षा पायी चालण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
- गरिबांपेक्षा कमी चालणा-या उच्च उत्पन्न गटातील लोकांमध्येही पायी चालण्याचे प्रमाण वाढले आहे.
- मे 2020 मध्ये सरकारने पादचा-यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले होते. तसेच पायी चालण्यासाठी योग्य लेन बनवण्याचे आश्वासन दिले होते.
Join Our WhatsApp Community