राज्यातील जेष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. शुक्रवारी, ९ एप्रिल रोजी रात्री उशिरा हा आदेश काढण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे आधी राज्य पोलीस दलाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.
अखेर पांडेंंना न्याय मिळाला!
संजय पांडे जेष्ठ अधिकारी असून देखील अनेक वर्षांपासून त्यांना महत्वाच्या पदापासून वंचित ठेवण्यात आले होते. अखेर सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्यांना महाआघाडी सरकारने न्याय दिला असल्याची चर्चा पोलीस दलात होत आहे. संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे पोलीस अधिकारी असून सध्या त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाचा कार्यभार देण्यात आला होता. मात्र त्यांनी पदभार स्वीकारण्यास नकार देत सुट्टीवर जाण्याचा अर्ज केला होता. आता अत्यंत प्रामाणिक अधिकारी असलेले संजय पांडे यांना ठाकरे सरकारने योग्य तो न्याय दिला आहे. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक रजनीश शेठ यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार होता. मात्र, शुक्रवारी राज्याच्या गृह विभागाने नवा आदेश काढत महासंचालक व पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार संजय पांडे यांच्याकडे सोपविला आहे. यापूर्वी संजय पांडे यांनी मुंबईत पोलोस उपायुक्त, होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, होमगार्डचे महासंचालक पदी काम केले आहे.
( हेही वाचा : आता नागपूरच्या कोविड रुग्णालयाला आग; ४ जणांचा मृत्यू )
Join Our WhatsApp Community