हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते माधवराव नगरकर यांचे निधन

हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते माधवराव नगरकर यांचे गुरुवारी, २२ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर दादर, शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. माधवराव नगरकर हे २००४-२००५ या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कोषाध्यक्ष होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गुरुस्थानी मानत

माधवराव नगरकर हे हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या निधनाने हिंदू महासभेने प्रखर हिंदुत्वनिष्ठ, निस्सीम सावरकर भक्त आणि हिंदू महासभेचा नेता गमावला आहे. माधवराव नगरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गुरुस्थानी मानत असत. वयोवृद्ध असूनही ते हिंदू महासभेत सक्रीय होते. हिंदुत्वाच्या विषयाबाबत ते कायम सजग असायचे. माधवराव नगरकर हे खासगी कंपनीत नोकरीला होते, सेवानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी हिंदुत्वाच्या कामाला स्वतःला झोकून दिले. अखेरच्या श्वासापर्यंत माधवराव नगरकर हे हिंदुत्वाच्या कार्यासाठी तत्पर होते.

(हेही वाचा ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश देण्यास विरोध)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here