‘या’ प्रकरणात विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांची होणार चौकशी

कोरेगाव- भीमा हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक आणि डाॅक्टर शिवाजी पवार यांची चौकशी होणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. 21 ते 25 जानेवारी दरम्यान तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिका-यांची चौकशी करुन त्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. त्यादिवशी नेमके काय घडले होते, पोलीस अधिका-यांचे म्हणणे काय हे जाणून घेतले जाणार आहे.

सह्याद्री अतिथीगृहात होणार चौकशी 

विश्वास नांगरे पाटील हे भीमा- कोरेगाव प्रकरणावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक होते, तर सुवेझ हक हे पुणे पोलीस अधीक्षक होते. याशिवाय सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार हे या प्रकरणात तपास अधिकारी होते. या सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी हर्षाली पोतदार हिची देखील आयोगासमोर चौकशी केली जाणार आहे. 21 ते 25 जानेवारी दरम्यान सह्याद्री अतिथीगृह इथे या सगळ्यांची चौकशी होणार आहे. हर्षाली पोतदारची 21 ते 22 जानेवारी, डाॅक्टर शिवाजी पवार यांची 21 ते 23 जानेवरी, विश्वास नांगरे पाटील 24 ते 25 जानेवारी आणि सुवेझ हक यांची 24 ते 25 जानेवारी दरम्यान चौकशी होणार आहे.

( हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, वाहतुकीत मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here