रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दादा वाडेकर यांचे मंगळवार दिनांक 14 रोजी वयाच्या 82 वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. वाड्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.
लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा पुढे नेण्याचं काम त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केले. यशस्वी उद्योगा बरोबर सेंद्रिय शेती करत असताना परिसरातील शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांनी शेतीची अवजारे तयार करण्याची कंपनी सुरू केली होती. वाडा परिसरातील असंख्य कोवळ्या मनावर त्यांनी शाखेच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाचे संस्कार बिंबवले. वाड्यातील संघाच्या अनेक संस्था, संघटनांवर त्यांच्या आत्मियतापूर्ण शैलीचा प्रभाव होता. ते संघाचा चालता बोलता स्मृतिकोषच होते.
“दुरीतांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सुर्ये पाहो जो जे र्वांछिल तो ते लाभो प्राणी जात “ अशा भावनेतून प्रत्यक्ष जीवन जगणारे , प्राणी पक्षांना रोज खाऊ घातल्याशिवाय ज्यांचा दिवस उगवलाच नाही असा करूणेचा सागर आज अचानक आटला तो कायमचा.. उद्योजकता संशोधन या कौशल्याचा केवळ स्वतःलाच लाभ न देता सर्व समाजाला लाभ मिळावा त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आणि समाधान पावणे हा त्यांच्या जीवनाच्या प्रवासाचा ठरलेला पथ होता . आहार आणि व्यायाम हा त्यांच्या सुदृढ जगण्याचा मंत्र होता . यशस्वीपणे उद्योग सांभाळताना समाजकार्याची कास कधी सोडली नाही त्यामुळेच आणीबाणीमधेही संपूर्ण वाड्यातून त्यांनाच कैद झाली होती . आपल्या घराला समाज जीवनाचे आधार केंद्र बनवणारे , समाजाभिमुख आयुष्य जगणारे आणि अजून पुढे अनेक वर्षां साठी समाज सुलभतेच्या कामांची स्वप्नं पाहणारे स्वयंसेवक ,स्वातंत्र्य सेनानी ,उद्योजक ,संशोधक , सच्चे समाजसेवक आज पंचतत्वात विलीन झाले
त्यांच्या पश्चात पत्नी जयश्री वाडेकर, २ मुले बिपिन, मिलिंद, सुना अर्चना , दर्शना, मुलगी रश्मी, जावई अतुल भातखळकर आणि नातवंडे कौशिक, सौमित्र आणि चिन्मय असा मोठा परिवार आहे.
Join Our WhatsApp Community