Senior Section Engineer Railway Salary : रेल्वेतील विभागीय अभियंता काय काम करतो, त्याचा पगार किती?

Senior Section Engineer Railway Salary : २०२४ सालासाठी रेल्वे पदभरती मंडळाकडून लवकरच विभागीय अभियंता पदासाठी नेमणुका सुरू होणार आहेत 

130
Senior Section Engineer Railway Salary : रेल्वेतील विभागीय अभियंता काय काम करतो, त्याचा पगार किती?
Senior Section Engineer Railway Salary : रेल्वेतील विभागीय अभियंता काय काम करतो, त्याचा पगार किती?
  • ऋजुता लुकतुके

रेल्वे पदभरती मंडळाच्या २०२४ साठीच्या स्पर्धा परीक्षा आणि त्यानुसार होणारी पदभरती प्रक्रिया सुरूही झाली आहे. यात रेल्वेसाठी विभागीय अभियंता पदाच्या नेमणुकाही येत्या काळासाठी जाहीर होण्याची शक्यता आहे. यात विभागीय अभियंता आणि वरिष्ठ विभागीय अभियंता अशा दोन पदांसाठी नेमणुका असतली. आपण वरिष्ठ विभागीय अभियंता पदासाठीचा पगाराचा स्तर आणि कामाचं स्वरुप समजून घेऊया. (Senior Section Engineer Railway Salary)

(हेही वाचा- Bangladesh मधील हिंसाचारात मारल्या गेलेल्या ६५० लोकांत सर्वाधिक हिंदू; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल)

www.indianrailways.gov.in या भारतीय रेल्वेच्या संकेत स्थळावर रेल्वे अंतर्गत निघणाऱ्या रिक्त पदांची जाहिरात दिली जाते. यंदा वरिष्ठ विभागीय अभियंता पदासाठी ४००० हून अधिक रिक्त जागा निघतील असा प्राथमिक अंदाज आहे. या नेमणुका देशभरात असतील. यासाठीची परीक्षाही ऑनलाईन स्वरुपात असते. सध्या सातवा वेतन आयोग सरकारी नोकऱ्यांसाठी लागू आहे. त्यानुसार, वरिष्ठ विभागीय अभियंता पदावर नेमणूक झालेल्या व्यक्तीचा वार्षिक पगार हा ५.७६ लाख रुपये इतका असेल. अर्थात, याशिवाय काही भत्तेही अभियंत्याला मिळतील. मासिक पगार ४४,९०० रुपये इतका असेल. (Senior Section Engineer Railway Salary)

रेल्वे वरिष्ठ विभागीय अभियंता (रेल्वे पदभरती मंडळाची नेमणूक)

मूलभूत पगार

रु. ४४.९००

महागाई भत्ता

रु. ३,१४३

घरभाडे भत्ता

९%, १८%, २७% यापैकी एक

प्रवास भत्ता

रु. ३,६००

एकूण पगार

रु. ६३,००० ते ९०,०००

वरिष्ठ विभागीय अभियंता पदासाठी निर्धारित कामाचं स्वरुपही समजून घेऊया. रेल्वेच्या विविध विभागांमध्ये चालणारी देखभालीची आणि दुरुस्तीची काम या अभियंत्याच्या अखत्यारीत येतात. या कामांवर लक्ष ठेवणं, अहवाल तयार कऱणं, रेल्वेच्या विविध विभागांमध्ये ही कामं हातात घेणं आणि पूर्ण करणं, रेल्वे डब्यांची सज्जता व दर्जा राखण्यासाठी कामावर देखरेख करणं ही वरिष्ठ विभागीय अभियंत्याची कामं आहेत. याशिवाय हाताखाली काम करणाऱ्या अभियंत्यांच्या कामांमध्ये सुसुत्रता आणणं हे ही वरिष्ठ अभियंत्याचं काम आहे. (Senior Section Engineer Railway Salary)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.