बुधवारी शेअर बाजार नव्या उच्चांकासह उघडला. बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स ६३७१६ वर आणि निफ्टी १८९०८ वर उघडला. काल म्हणजेच मंगळवारी बीएसई सेन्सेक्स ४४६ अंकांनी वाढून ६३,४१६ वर बंद झाला होता. एचडीएफसी, एसबीआय आणि रिलायन्सच्या वाढीमुळे बुधवारी थेट दुसऱ्या सत्रात देशांतर्गत शेअर्समध्ये वाढ झाली. BSE बेंचमार्क सेन्सेक्सने ६३,७१६ चा ताजा विक्रमी उच्चांक गाठला, तर NSE निफ्टी ५० हा १८,९०८.१५ वर उघडला. सकाळी ९.३० पर्यंत सेन्सेक्स १७५.५३ अंकांनी म्हणजेच ०.२८ टक्क्यांनी वाढून ६३,५९१.५६ वर, तर निफ्टी ५० ५६.६५ अंकांनी म्हणजेच ०.३० टक्क्यांनी वाढून १८,८७४.०५ वर पोहोचला.
सर्व शेअर्स हिरव्या रंगात उघडलेत आणि निर्देशांक सुरुवातीच्या व्यापारात हिरव्या रंगात व्यवहार करीत होता. पीएसयू बँक निर्देशांक ०.६४ टक्क्यांनी वाढला, त्यानंतर निफ्टी मेटल ०.४९ टक्क्यांनी, ऑटो निर्देशांक ०.४२ टक्क्यांनी आणि आयटी निर्देशांक ०.३७ टक्क्यांनी वाढला. दरम्यान, निफ्टी स्मॉलकॅप ५० ०.६९ टक्क्यांनी, निफ्टी स्मॉलकॅप १०० ०.६१ टक्क्यांनी, निफ्टी स्मॉलकॅप ३५० ०.५८ टक्क्यांनी वाढला आणि निफ्टी मिड स्मॉलकॅप ४०० ०.५१ टक्क्यांनी वधारला.
(हेही वाचा – पावसाची संततधार : विक्रोळीमध्ये घरावर कोसळला डोंगराचा भाग; तर मालाड येथे झाड पडून एकाचा मृत्यू)
गौतम अदाणी यांनी मंगळवारी हिंडेनबर्ग अहवालात चुकीची माहिती दिली असल्याचे सांगितल्यानंतर सुरुवातीच्या व्यापारात अदाणी एंटरप्रायझेस अव्वल लाभधारकांपैकी एक होता, कारण तो ०.९० टक्क्यांनी वाढला होता. दुसरीकडे HDFC लाईफ, ओएनजीसी, एनटीपीसी, सिप्ला, कोटक बँक, कोल इंडिया, अॅक्सिस बँक, पॉवर ग्रिड, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या वेळी सर्वाधिक तोट्यात होते. टाटा मोटर्स, एसबीआय, डिव्हिस लॅब, टायटन, आयशर मोटर्स, टाटा स्टील, हिंदाल्को, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, ब्रिटानिया, टेक महिंद्रा, एचडीएफसी, इन्फोसिस आणि एशियन पेंट्स हे सकाळच्या व्यवहारात आघाडीवर होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community