दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊलमध्ये हॅलोवीन पार्टीदरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटना इतकी भीषण होती की, यामध्ये आतापर्यंत १५१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय तर १०० हून अधिक जण जखमी झालेत. गर्दीतल्या ५० जणांना हृदयविकाराचा झटका आला असून या हॅलोवीन फेस्टीव्हलच्या पार्टीत झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढत असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
(हेही वाचा – Travel Insurance: अवघ्या 1 रुपयात मिळवा प्रवास विमा! वाचा काय आहे योजना?)
मिळालेल्या माहितीनुसार, हॅलोविन पार्टीदरम्यान ही चेंगराचेंगरीची घटना घडली. कोरोनाच्या संकटानंतर मोठ्या प्रमाणावर मास्क फ्री हॅलोवीन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी साधारण एक लाख लोकं जमल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत अनेक जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत तर मृत्यू झालेल्यांपैकी अनेकांचे वय हे २०-३० च्या दरम्यान होते. या पार्टीदरम्यान, एक सेलिब्रिटी आल्यानंतर त्याला पाहण्यासाठी गर्दी जमा झाली त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. पण या झालेल्या चेंगराचेंगरीसंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Seoul Halloween stampede | Death toll rises to 151 including 19 foreigners from Iran, Uzbekistan, China and Norway, reports Yonhap news agency
— ANI (@ANI) October 30, 2022
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हॅलोवीन फेस्टिव्हलच्या व्हिडिओतून काही लोक मोठी गर्दी जमल्याने चक्कर येऊन पडत असल्याचे दिसत आहे. आरोग्य यंत्रणेकडून आपत्कालीन सेवांद्वारे रस्त्यावरच त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
Join Our WhatsApp Community