‘फार्मासिस्ट्स सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा’

189

फार्मासिस्ट्स हा नेहमी दिवसरात्र कठोर परिश्रम करून समाजाला निरोगी ठेवण्याचे काम करत असतो. यापैकी बहुतेक फार्मासिस्ट्स हे नेहमी पडद्यामागे शांतपणे काम करतात, यामुळेच त्यांच्या कठोर परिश्रम आणि समाजातील योगदान ओळखण्याची आवश्यकता आहे. फार्मासिस्ट हा नेहमी त्याच्याकडे म्हणजेच औषधलयामध्ये येणार्‍या प्रत्येक रुग्णाच्या औषधी, प्रमाण तसेच पद्धती सुनिश्चित करतात. योग्य औषध, योग्य मात्रा पुरविण्याचे काम फार्मासिस्ट करतात, त्यामुळे औषध निर्मात्यांना देखील त्यांचा योग्य सन्मान देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.महानगरपालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी घाटकोपर मधील महानगरपालिकेच्या राजावाडी उपनगरीय रुग्णालयात आंतरराष्ट्रीय औषध निर्माता दिवस निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना नमूद केले.

(हेही वाचा – विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र विकास मंडळे पुर्नगठीत करण्यास मंजूरी)

जागतिक स्तरावर दरवर्षी २५ सप्टेंबर हा दिवस जागतिक औषध निर्माता दिन म्हणून ओळखला जातो. या आंतरराष्ट्रीय औषध निर्माता (फार्मासिस्ट) दिवस निमित्ताने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर स्थित राजावाडी रुग्णालयात विविध नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी झालेल्या मुख्य समारंभात मार्गदर्शन करताना प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर म्हणाल्या की, औषध निर्माता हा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अतिशय महत्त्वाचा दुवा असतो. वैद्यकीय मंडळी, परिचारिका यांच्याप्रमाणेच रुग्ण सेवेमध्ये औषध निर्मात्यांची महत्त्वाची भूमिका असते.

लोकांना निरोगी जीवनाचा सल्ला देण्यासह, रोगापासून बचाव करण्यासाठी औषधे योग्य प्रकारे खात्री करून घेवून उपचारांचे चांगले व्यवस्थापन व रुग्णांची जीवन शैली बदलण्यास प्रवृत्त करणे, हे उद्दिष्ट गाठण्यामध्ये औषध निर्मात्यांची भूमिका सर्वाधिक मोलाची असते. फार्मासिस्ट्स हा नेहमी दिवसरात्र कठोर परिश्रम करून समाजाला निरोगी ठेवण्याचे काम करत असतो. यापैकी बहुतेक फार्मासिस्ट्स हे नेहमी पडद्यामागे शांतपणे काम करतात, यामुळेच त्यांच्या कठोर परिश्रम आणि समाजातील योगदान ओळखण्याची आवश्यकता आहे.

बहुतेक लोक फार्मासिस्ट्सने पुरविलेल्या सेवांच्या व्यापकतेपासून अज्ञात आहेत आणि त्यांना फक्त औषधे वितरीत करणार्‍या व्यक्ती म्हणून ओळखले जाते. फार्मासिस्ट हा नेहमी त्याच्याकडे म्हणजेच औषधलयामध्ये येणार्‍या प्रत्येक रुग्णाच्या औषधी, प्रमाण तसेच पद्धती सुनिश्चित करतात. योग्य औषध, योग्य मात्रा पुरविण्याचे काम फार्मासिस्ट करतात, त्यामुळे औषध निर्मात्यांना देखील त्यांचा योग्य सन्मान देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे ठाकूर यांनी नमूद केले.

राजावाडी रुग्णालयाच्या औषधी निर्माण (फार्मसी) विभागाचे मुख्य औषध निर्माता अजय काकड यांनी, रुग्णांनी औषधे घेताना काय काळजी घ्यावी, कुठली औषधे घ्यावी अथवा कुठली घेऊ नयेत, कोणत्या वेळी कोणते औषध घ्यावे, जेवणाआधी की जेवणानंतर, थंड पाणी की कोमट पाणी की दुधासोबत औषधे घ्यावेत, अशा अनेक प्रकारच्या सल्ल्यांमुळे औषधांची परिणामकारकता वाढण्यास मदत होते. यामुळे औषध निर्माता हा रुग्णांचा विश्वास टिकविण्यासाठी किंबहुना आरोग्य व्यवस्थेवर रुग्णांचा विश्वास निर्माण करण्यामध्ये मोलाचे सहाय्य करत असतो, असे त्यांनी नमूद केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.