मुंबईत सिरीयल रेपिस्टला अटक

84

लहान मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्या सिरीयल रेपिस्टला घाटकोपर पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली आहे. या सिरीयल रेपिस्टवर मुंबईत पाच पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले असून कोविड काळात तो जामिनावर बाहेर आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्रातल्या ‘हुनर’बाज महिला उद्योजक )

लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

घाटकोपर पश्चिमेला राहणाऱ्या एका सात वर्षांच्या मुलीला वडापावचे अमिष दाखवून एका निर्मनुष्य झुडुपात नेत तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच घाटकोपर येथे घडली, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडवून दिली होती. घाटकोपर पोलिस ठाण्यात याप्रकरणी पोक्सो, अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीच्या शोधासाठी घाटकोपर पोलीस ठाण्याचे ८ जणांचे पथक गठीत करण्यात आले होते.

तांत्रिक पुरावे, आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्यात आली असता आरोपी हा सिरीयल रेपिस्ट सचिन शामा (३५)असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली.

भिवंडीतून अटक

सचिन शामा चा शोध घेतला जात असताना तो भिवंडीत लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घाटाकोपर पोलिसांनी त्याचा शोध घेत नुकतीच त्याला भिवंडीतून अटक केली आहे. सचिन शामा याच्या विरुद्ध पूर्व उपनगरातील विविध पोलीस ठाण्यात पाच पेक्षा अधिक बलात्काराचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. कोविडच्या काळात एका गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला होता, व तो तुरुंगातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने पुन्हा लहान मुलींना लक्ष करणे सुरू केले होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.