पुण्यातील नवले पुलावर अपघातांची मालिका; ३ तासांतील दुसरी घटना

102

पुण्याच्या नवले पुलावरील अपघाताची मालिका काही केल्या संपत नाहीये. गेल्या ३ तासात नवले पुलावर दुसऱ्यांदा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रक रस्त्याच्या मध्यभागी धडकल्यामुळे चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ट्रक चालकाचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : Navale Bridge Accident : अपघात रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांचा ‘मेगाप्लॅन’! )

तर २२ नोव्हेंबरला सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या सुमारास कात्रजच्या दिशेने मुंबईला जाणाऱ्या भरधाव ट्रकचा अपघात झाला होता. नवले पुलावरील तीव्र उतारामुळे हे अपघात होत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यावर आता महामार्ग प्रशासनाने महामार्गावरील उतारावर सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्त्याची जोपर्यंत पुनर्बांधणी होत नाही तोपर्यंत ही अपघातांची मालिका संपणार नसल्याचे मत स्थानिकांनी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना व्यक्त केले.

दरम्यान, नवले पुलाजवळ ४७ वाहनांना धडक देणाऱ्या ट्रक चालकाला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. चाकण येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. नवले पूल परिसरात रविवारी रात्री झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले. या प्रकरणी ट्रक चालक मणीराम छोटेलाल यादव (रा. मध्य प्रदेश) याच्या विरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.