अहमदनगरमध्ये बोगस सर्पमित्रांचा सुळसुळाट

वन्यप्राणीमित्रांची कडक करवाईची मागणी

144

विनापरवाना नाग पकडल्याप्रकरणी पैसे मागण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अहमदरनगर येथील शीतल कसारवर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्या आला आहे. कोब्रा बाळगल्याप्रकरणी केवळ वनविभागाने गुन्हा दाखल केला, ताब्यात का घेतले नाही, असा प्रश्न वन्यप्राणीमित्र विचारत आहे. अहमदनगर येथे बोगस सर्पमित्रांचा सुळसुळाट होत असून, प्रत्येकाने इन्स्टाग्राम आणि युट्युबरव वन्यजीवांचे प्रदर्शन सुरु केले आहे. या प्रकरणी वनविभागाने सुरुवातीपासूनच कडक भूमिका घेतली नसल्याने वन्यप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

बोगस आणि स्वयंघोषित सर्पमित्रांचे जाळे

कोब्रा हा वन्यजीव संवर्धन कायद्याअंतर्गत पहिल्या वर्गवारीत संरक्षित आहे. त्यामुळे या प्रकरणी तुरुंगवासाची तरतूद आहे, बोगस आणि स्वयंघोषित सर्पमित्रांचे जाळे तोडण्यासाठी वनविभाग संथगतीने कारवाई करत असल्याने हा प्रकार नियंत्रणात येत नसल्याची तक्रार वन्यप्राणीमित्र करताहेत. अहमदनगर वनविभाग (प्रादेशिक) च्या उपवनसंरक्षक यांनी याप्रकरणी संपूर्ण चौकशी शुक्रवारपासूनच सुरु झाल्याचे सांगितले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आर्थिक दंड आकारायचा का तुरुंगावासाचा निर्णय द्यायचा हा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण दिले.

(हेही वाचा – स्वयंघोषित सर्पमित्राकडून पैशाची मागणी)

बोगस सर्पमित्रांचा सुळसुळाट

शीतल कसार ही नुकतीच अहमदनगर येथील ‘वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटी’ या संघटनेतून बाहेर पडली होती. ही संस्था स्वयंघोषित सर्पमित्र आकाश जाधव यांच्या पुढाकाराने सुरु झालीय. आकाश जाधव यांचे स्वतःचे ‘सर्पमित्र आकाश जाधव’ नावाचे युट्यूब चॅनेल आहे. वन्यजीवांचे सोशल माध्यमावर प्रदर्शन करुन त्यातून पैसा कमावला जात असल्याची तक्रारही स्थानिक प्राणीप्रेमी संस्थांनी अहमदनगर वनविभागाला केली आहे. आकाश जाधव यांच्यावर २०१६ सालीही तक्रार दाखल झालेली असताना, युट्यूबच्या माध्यमातून वन्यजीवांच्या प्रदर्शनावर वनविभागाने तातडीने बंदी का नाही घातली, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

बोगस सर्पमित्रांची हजेरी

शुक्रवारी अहमदनगर येथील सर्व सर्पमित्रांनी वनविभागाच्या प्रादेशिक कार्यालयाला हजेरी लावली. शीतल कसारला राहत्या घरातून वनविभागाने सकाळी सात वाजता भेट देत कारवाईसाठी कार्यालयात आणलं. सुमारे आठ तास सलग शीतलची चौकशी केली गेली. सायंकाळी तिला घरी जाण्याची वनविभागाने परवानगी दिली. मात्र चौकशीसाठी तिला सतत वनविभागाच्या कार्यालयात हजर रहावे लागणार आहे. आकाश जाधव यांना युट्यूब चॅनेल बंद करण्याचा आदेश वनविभागाने दिलाय. जाधव यांचीही चौकशी सुरु केल्याची माहिती अहमदनगर वनविभागाच्या (प्रादेशिक) उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.