सेवा क्षेत्राची कामगिरी उंचावली, एप्रिलमध्ये १३ वर्षांतील सर्वाधिक वाढ

293
सेवा क्षेत्राची कामगिरी उंचावली, एप्रिलमध्ये १३ वर्षांतील सर्वाधिक वाढ
सेवा क्षेत्राची कामगिरी उंचावली, एप्रिलमध्ये १३ वर्षांतील सर्वाधिक वाढ

देशाच्या सेवा क्षेत्राची वाढ सरलेल्या एप्रिल महिन्यात लक्षणीय उच्चांक नोंदवणारी राहिली. नव्याने आलेल्या कामांचा ओघ आणि उत्पादन वाढल्याने सेवा क्षेत्राने १३ वर्षांपूर्वीच्या उच्चांकाचा जवळ जाणारा विस्तारा नोंदवल्याचे बुधवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणातून समोर आले.

भारतातील सेवा व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा एस, अॅण्ड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पीएमआय निर्देशांक एप्रिल महिन्यात ६२ गुणांवर नोंदवला गेला. ही निर्देशांकांची जून २०१० नंतरची उच्चांकी पातळी आहे.

एप्रिलमध्ये सलग २२व्या महिन्यात सेवा क्षेत्राची कामगिरी ५० गुणांवर राहिली आहे. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास तो आकुंचनाचा निदर्शक मानला जातो. जरी किंमतीच्या आघाडीवर, एप्रिलमध्ये कच्चा मालासाठी खर्च तीन महिन्यात सर्वात जलद गतीने वाढला असला तरी नवीन कामांचा ओघ वाढल्याने नव्या व्यवसायांमध्ये आणि उत्पादन व सक्रियतेत अतिशय जलद गतीने वाढ झाली आहे.

(हेही वाचा – तीन दशकांत २७ हवाई कंपन्यांना उतरती कळा)

निर्यातीत विस्तार

नव्या व्यवसायांमधील वाढ आणि बाजारातील पूरक वातावरण यामुळे सेवा क्षेत्रात वाढ झालेली आहे. अभ्यासलेल्या चार उपक्षेत्रांपैकी वित्त आणि विमा क्षेत्रांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. भारतीय सेवांना एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याचे कंपन्यांनी सांगितले आहे. निर्यातीत विस्तार होत असल्याचे हे निदर्शक असल्याचे सर्वेक्षणातून सांगण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.