मुंबईतील (Mumbai) अंधेरी (Andheri) भागात असलेले सेव्हन हिल्स (Seven Hills Hospital Mumbai) हे प्रशस्त व १५०० बेड्सचे रुग्णालय मुंबईकरांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरू शकते. आंध्र प्रदेशातील एक खाजगी कंपनी हे रुग्णालय चालवत होती पण ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने हे रुग्णालय आता इतर खाजगी कंपनीस चालवण्यास देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हेही वाचा-Maha Kumbh Mela 2025 : महाकुंभात सुरक्षा यंत्रणांचे मॉकड्रील; NSG आणि NDRF ने केला सराव
सेव्हन हिल्स हॉस्पिटल (Seven Hills Hospital Mumbai) हे अंधेरीत मोक्याची जागी १६ एकर जागेवर आहे, १५०० बेड्सची क्षमता आहे, बाजारभावानुसार या जागेचे ३ हजार ते ४ हजार कोटी रुपये मुल्य होते. हॉस्पिटलच्या शिल्लक असलेल्या जागेत मेडीकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज सुरु करता येऊ शकते.
हेही वाचा-नव्या वर्षात २६४० नव्या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार; Pratap Sarnaik यांची माहिती
एम्स सारखे सर्व वैद्यकीय सुविधांनीयुक्त असे हॉस्पिटल होऊ शकते. कोविड काळात याच रुग्णालयात ६० हजार पेशंटवर उपचार करण्यात आले आहेत. हे रुग्णालय खाजगी कंपन्यांना देण्याचा राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न असून इच्छुक कंपन्यांमध्ये मुकेश अंबानी यांच्या कंपनीचाही समावेश आहे. (Seven Hills Hospital Mumbai)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community