लैंगिक अत्याचार करणारा पिता निघाला एचआयव्हीग्रस्त…

176

एचआयव्हीग्रस्त सावत्र पित्याने १४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना दक्षिण मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत माहीत असून देखील जन्मदाती आईने तिच्याकडे लक्ष दिले नाही. अखेर एका सामाजिक संस्थेने या घटनेला वाचा फोडून नराधम सावत्र पित्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आझाद मैदान पोलिसांनी सावत्र पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पिता आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

रात्रीच्या वेळी संधी साधून पीडित मुलीवर केले अत्याचार

पीडित मुलगी ही आई आणि ४५ वर्षीय सावत्र पित्यासोबत फोर्ट परिसरातील एका मोठ्या खाजगी रुग्णालय परिसरात राहत होती. गेल्या आठवड्यात सोबत राहणाऱ्या सावत्र पित्याने रात्रीच्या वेळी संधी साधून पीडित मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी मुलीने झालेला प्रकार आईला सांगितला मात्र तिने याबाबत आता कुठेही वाच्यता करू नको म्हणून मुलीला गप्प केले. मात्र या घटनेमुळे पीडित मुलगी घाबरली होती.

(हेही वाचा मुस्लिम संघटनांनी घेतली हिजाबवर बैठक! काय घेतला निर्णय?)

पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल

आपल्यावर पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते या भीतीने तिने हा प्रकार जवळच राहणाऱ्या एका महिलेला सांगितला, या महिलेने एका सामाजिक संस्थेच्या मदतीने या मुलीला धीर देत अखेर मंगळवारी आझाद मैदान पोलीस ठाणे गाठले व सावत्र पित्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून सावत्र पित्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी ज्या वेळी अटक आरोपीची वैद्यकीय चाचणी केली असता आरोपी हा एचआयव्हीग्रस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी तात्काळ चाईल्ड वेल्फेअर कमिटीसमोर पीडित मुलीला हजर करून तिची एचआयव्ही चाचणी करण्यात आली असता ती निगेटिव्ह आली असल्याची माहिती समोर आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.