आर्यन खानच्या एनसीबीच्या कोठडीतील मुक्काम वाढला!

या रेव्ह पार्टीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कनेक्शन आहे, असा संशय एनसीबीने व्यक्त केला.

मुंबई-गोवा दरम्यान समुद्रात क्रूझवर टाकलेल्या एनसीपीच्या धाडीत अटक करण्यात आलेल्या किंग खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह ८ जणांना सोमवारी, ४ ऑक्टोबर रोजी स्थानिक न्यायालयात सादर करण्यात आले. त्यावेळी एनसीबीने जुहू येथून या प्रकरणातील ९व्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी आर्यनसह ८ जणांना ड्रग पुरवायचा. या ड्रग्स पेडलरसोबतचे आर्यनचे संवाद हाती लागले आहेत. त्यामुळे या रेव्ह पार्टीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कनेक्शन आहे का, हे शोधायचे आहे, म्हणून आर्यनच्या एनसीबी कोठडीत ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्याची मागणी एनसीबीचे विशेष वकील अनिल सिंग यांनी स्थानिक न्यायालयात केली. त्यानुसार न्यायालयाने आर्यन खानसह तीन आरोपींची ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी वाढवली.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध असल्याचा आरोप

दरम्यान आर्यनकडे छोट्या संख्येने ड्रग्स सापडले म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे अथवा जामीन देणे योग्य ठरणार नाही. आम्हाला संपूर्ण देश हा अमली पदार्थ मुक्त करायचा आहे, असेही एनसीबीने म्हटले आहे. दरम्यान क्रुझवरुन ८ जणांना ताब्यात घेण्यात आले होते, त्यानंतर ९ व्या आरोपीला जुहू येथून अटक केली. तो आरोपी ताब्यात घेतलेल्या ८ जणांना ड्रग्स पुरवायचा, म्हणून याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध दिसून येत आहे, अशी शक्यता एनसीबीच्या वकिलाने कोर्टात व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्हाला सर्वांना एकत्र बसवून त्यांची चौकशी करायची आहे, म्हणून एनसीबीची कोठडी वाढवून मिळावी अशी, मागणी केली.

(हेही वाचा : आर्यन खानला होणार 10 वर्षांची शिक्षा?)

आर्यनकडे ड्रग्स सापडलेच नाही!

यावेळी आर्यनच्या बाजूने युक्तीवाद करणारे वकील सतीश मानेशिंदे यांनी आर्यनकडे ड्रग्स सापडले नाहीत, असा दावा न्यायालयात केला, आर्यनचा मित्र मर्चंट याच्याकडे ६ ग्रॅम ड्रग्स सापडले. मात्र आर्यन याच्याकडे ड्रग्स सापडले नाही, असा दावा मानशिंदे यांनी केला आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्यांपैकी आर्यनसह ३ जणांनी जामीन अर्ज दाखल केला आहे, तर उर्वरित ५ जणांच्या कोठडीत वाढ करायची का, यावर युक्तीवाद करण्यात आला.

एनसीबीने काय म्हटले न्यायालयात? 

या प्रकरणात अनेक संशयित आरोपी आहेत, ज्यांची अजून ओळख पटवयाची आहे. त्यासाठी त्यांची चौकशी गरजेची आहे. आर्यन खान हा पेमेंट करण्यासाठी कशाच्या माध्यमातून करायचा हे विचारताना तो आढळून आला आहे. यात बऱ्याच कोडवर्डचा वापर यात करण्यात आला. आम्ही आरोपींच्या चौकशीदरम्यान जुहूमधील ९ व्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले. या आरोपींवर जामीन मिळणारे असे सेक्शन जरी लावलेले असले तरी आपण मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झालेली तीन उदाहरणे समोर ठेवतो, ज्यामध्ये NDPS ऍक्टमधील प्रकरणात जामीन नाकारण्यात आला होता, असे एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी म्हटले आहे. यावेळी वकील अनिल सिंग रिया चक्रावर्तीची ऑर्डर वाचून दाखवत आहेत ज्यात तिला जामीन नाकारण्यात आला होता, असे म्हटले. रिया चक्रवर्तीच्या प्रकरणात NDPS ऍक्टमधील सेक्शनमध्ये जामीन नाकारण्यात आला होता. आम्ही समाजाला ड्रग्समुक्त बनवण्याची मोहीम राबवतोय त्यामुळे तुमच्याकडे कमी प्रमाणात ड्रग्स सापडलं याचा अर्थ तुम्हाला बेल मिळावी अस तुम्ही म्हणू शकत नाही, असे वकील सिंग म्हणाले.

काय म्हटले आर्यनच्या वकिलाने? 

अशाच प्रकरणातील सत्र न्यायालयातील एक निकाल आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांनी वाचून दाखवला. तसेच उच्च न्यायालयातील सोहेल खान विरुद्ध राज्य सरकार सुनावणीचाही संदर्भ दिला. रिया चक्रवर्तीवर ड्रग्ससाठी तिने पैसे पुरवले, असे आरोप होते, तसे आर्यन  खानवर नाही. व्हाट्स एप चॅट हे आर्यनच्या कोठडीसाठी पुरेसे कारण नाही. आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट एकत्र होते याचा अर्थ त्यांच्यात साम्य आहे, असे नाही. ती क्रूझ माझ्या अशिलाच्या मालकीची नाही. तुम्ही क्रूझवर ड्रग्स सापडले म्हणून क्रूझवर असलेल्या १ हजार लोकांना अटक करणार का? क्रूझवर असलेल्या लोकांशी आर्यन खानचा संबंध नाही, असे वकील मानशिंदे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here