मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद वादावर (Shahi Eidgah Survey) सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मशिदीची पाहणी करण्यासाठी आयुक्त (कोर्ट कमिशनर) नेमण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. मात्र, या प्रकरणाची सुनावणी सुरू ठेवावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
(हेही वाचा – Rahul Narvekar : ‘… म्हणून निकाल चुकीचा ठरत नाही’ ; ठाकरे गटाच्या टीकेला राहुल नार्वेकरांचे चोख उत्तर)
मशिदी समितीकडून उत्तर –
मथुरा येथील कृष्ण जन्मभूमी मंदिराला लागून असलेल्या शाही ईदगाहचे सर्वेक्षण (Shahi Eidgah Survey) करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका आयोगाला दिले होते. अशातच आता शाही ईदगाहच्या सर्वेक्षणावरील अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मशिदी समितीकडून उत्तर मागितले आहे.
(हेही वाचा – Loksabha Election: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या)
श्री कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशिदीच्या (Shahi Eidgah Survey) वादग्रस्त जागेची तपासणी करण्यासाठी आयुक्त नेमण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती.
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने, अलाहाबाद उच्च न्यायालयाने १४ डिसेंबर २०२३ रोजी दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली. “काही कायदेशीर समस्या (Shahi Eidgah Survey) निर्माण झाल्या आहेत. सर्वेक्षणासाठी उच्च न्यायालयासमोर केलेल्या आयुक्त नेमण्याच्या अस्पष्ट अर्जावरही खंडपीठाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Shahi Eidgah Survey)
(हेही वाचा – Action by ED: तृणमूल नेते शंकर आद्या यांच्या घरातून ईडीने जप्त केले बांगलादेशी चलन)
हिंदू संघटनेकडून उत्तर –
शाही ईदगाहच्या सर्वेक्षणावरील उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात मशिदीच्या समितीने (Shahi Eidgah Survey) दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने भगवान श्रीकृष्ण विराजमान या हिंदू संघटनेकडून उत्तर मागितले आहे.
पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी –
अशातच आता या प्रकरणाची (Shahi Eidgah Survey) पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community