आर्यन खानला होणार 10 वर्षांची शिक्षा?

84

मुंबई-गोवा क्रूझवर करण्यात आलेल्या कारवाईत एनसीबीने शाखरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आठही जणांकडून काही प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान एनसीबीने या सर्वांविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील कलमांपैकी २०(बी) या कलमात १० वर्षे कारावास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.

(हेही वाचाः शाहरुखचा मुलगा आर्यन खानला एनसीबीकडून अटक! कसे आणले होते आर्यनने ड्रग्स? वाचा)

मोठ्या प्रमाणावर ड्रग्स जप्त

शनिवारी दुपारी एनसीबीने मुंबई बंदरातून गोवा येथे निघालेल्या कॉर्डिलिया या प्रवासी क्रूझवर छापा टाकून क्रूझवर आयोजित करण्यात आलेली रेव्ह पार्टी उधळून लावली. यावेळी आर्यन खानसह पकडण्यात आलेल्या आठही जणांकडून एनसीबीने १३ ग्राम कोकेन, ५ ग्राम एमडी, २१ ग्राम चरस, एमडीएमच्या २२ गोळ्या आणि १ लाख ३३ हजार रोकड हस्तगत केली होती.

१० वर्ष शिक्षेची तरतूद

आठही जणांविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत(एनडीपीएस अॅक्ट) कलम २० बी, ८(सी)२७ आणि ३५ सह कलम लावण्यात आले आहे. कलम २० (बी) कलमात जो कोणी या कायद्याचे उल्लंघन करतो किंवा दिलेल्या नियमांचे वा अटींचे पालन न करता मादक पदार्थांची आंतरराज्यीय आयात-निर्यात केल्यास, तसेच अंमली पदार्थ व्यापारी प्रमाणापेक्षा कमी असतील तर त्यात १० वर्षे शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.

(हेही वाचाः कसे आले क्रूझवर ‘ड्रग्स’? जाणून घ्या संपूर्ण माहिती)

…तर जामीन देखील मिळू शकत नाही

कलम २७ कोणत्याही अंमली पदार्थ किंवा सायकोट्रॉपिक पदार्थाच्या वापरासाठी शिक्षेची तरतूद करते. त्यात असे म्हटले आहे की, जो कोणीही अंमली पदार्थ किंवा सायकोट्रॉपिक पदार्थाचे सेवन करतो त्याला शिक्षा होईल.
कलम २७ अंतर्गत सेवन करण्याची शिक्षा खूपच कमी आहे. जामिनासंदर्भात एनडीपीएस कायद्याचा आणखी एक मनोरंजक पैलू आहे.

यात तरतूद आहे की व्यावसायिक प्रमाण असलेल्या गुन्ह्यांसाठी सरकारी वकील जामीनाला विरोध करत असल्यास आरोपीला जामिनावर सोडता येत नाही. जर आरोपी अशा गुन्ह्यासाठी दोषी नाही आणि जामीनावर असताना त्याने कोणताही गुन्हा करण्याची शक्यता नाही असे न्यायालयाला वाटत असेल तरच अशा प्रसंगी जामीन मंजूर केला जाऊ शकतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.