Shaktikanta Das : शक्तिकांत दास यांना ग्लोबल टॉप सेंट्रल बँकरचा मान; RBI गव्हर्नरला मिळाले ‘A+’ रेटिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन

158
Shaktikanta Das : शक्तिकांत दास यांना ग्लोबल टॉप सेंट्रल बँकरचा मान; RBI गव्हर्नरला मिळाले 'A+' रेटिंग

भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांना ग्लोबल टॉप सेंट्रल बँकरचा मान मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन केले आहे.

अधिक माहितीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांना अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स मासिकाने जागतिक स्तरावर सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून स्थान दिले आहे. ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर्स रिपोर्ट कार्ड २०२३ मध्ये शक्तिकांत दास यांना ‘A+’ दर्जा देण्यात आला आहे. A+ रेटिंग मिळालेल्या तीन सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरांच्या यादीत शक्तिकांत दास अव्वल स्थानावर आहेत.

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पीएम मोदींनी ट्विटरवर लिहिले की, “आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांचे अभिनंदन. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, जो जगात आपले आर्थिक नेतृत्व प्रतिबिंबित करतो. शक्तिकांत दास यांचे समर्पण आणि दूरदृष्टी आपल्या देशाच्या विकासाच्या प्रवासाला बळकट करत राहील.”

(हेही वाचा – IND vs PAK Asia Cup : पावसामुळे रंगाचा बेरंग, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द)

ग्लोबल फायनान्स मॅगझिनच्या (Shaktikanta Das) एका निवेदनानुसार महागाई नियंत्रण, आर्थिक विकासाची उद्दिष्टे, चलन स्थिरता आणि व्याजदर व्यवस्थापनात यश मिळवण्यासाठी त्यांनी दिलेले ग्रेड A ते F या स्केलवर आधारित आहेत. ‘A’ उत्कृष्ट कामगिरीचे प्रतिनिधित्व करतो आणि ‘F’ संपूर्ण अपयशाचे प्रतिनिधित्व करतो.

शक्तिकांत दास यांची जूनमध्ये ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ म्हणून निवड

सेंट्रल बँकर्स रिपोर्ट कार्ड १९९४ पासून ग्लोबल फायनान्सद्वारे दरवर्षी प्रकाशित केले जाते. यामध्ये १०१ देश, प्रदेश आणि जिल्ह्यांच्या मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरना श्रेणीबद्ध केले आहे. यामध्ये बँक ऑफ युरोपियन युनियन, इस्टर्न कॅरिबियन सेंट्रल बँक, बँक ऑफ सेंट्रल आफ्रिकन स्टेट्स आणि सेंट्रल बँक ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स यांचा समावेश आहे. शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांना जून महिन्यात लंडनमध्ये सेंट्रल बँकिंग अवॉर्ड्स २०२३ मध्ये ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.